Join us  

Rafale deal controversy: फ्रान्स्वा ओलांद यांच्या पार्टनरला कोट्यवधी दिले, रिलायन्सचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2018 12:12 PM

Rafale deal controversy: मोदी सरकारने फ्रान्ससोबत केलेल्या राफेल करारावरुन भारतात गदारोळ माजला आहे. त्यातच, फ्रान्सचे माजी राष्ट्रपती फ्रान्स्वा ओलांद यांनी भारत सरकारच्या सांगण्यावरुनच रिलायन्सला हे कंत्राट मिळाल्याचे म्हटले

नवी दिल्ली - फ्रान्सचे माजी राष्ट्रपती फ्रान्स्वा ओलांद यांच्या सहकाऱ्यास आपण मदत केल्याचे रिलायन्सकडून स्पष्ट करण्यात आले आहे. रिलायन्सने फ्रेंच सिनेमा Taut-la-Haut या चित्रपटासाठी 15 टक्के फायनन्स केले होते. चित्रपटाच्या निर्मात्या जुली गाय या फ्रान्सचे तत्कालीन राष्ट्रपती फ्रान्सवा ओलांद यांच्या पार्टनर आहेत. रिलायन्सची इंटरनेटमेंटची सहकारी फर्म असलेल्या फ्रेंच फायनेन्सिंग फर्म Visvires Capital च्या माध्यमातून रिलायन्सने ही 1.48 मिलियन्स युरो म्हणजे जवळपास साडे बारा कोटी रुपये मदत केली होती. 

मोदी सरकारने फ्रान्ससोबत केलेल्या राफेल करारावरुन भारतात गदारोळ माजला आहे. त्यातच, फ्रान्सचे माजी राष्ट्रपती फ्रान्स्वा ओलांद यांनी भारत सरकारच्या सांगण्यावरुनच रिलायन्सला हे कंत्राट मिळाल्याचे म्हटले होते. त्यामुळे मोदी सरकारवर चौफेर टीका सुरू झाली आहे. तर राहुल गांधींनी मोदींना चोरांचे सरदार म्हटले. दरम्यान, आता रिलायन्सने याबाबत ओलांद यांच्या पार्टनरला आपण आर्थिक मदत केल्याचे स्पष्ट केलं आहे.

रिलायन्स ग्रुप आणि Visvires Capital या कंपन्यांनी चित्रपटाशिवाय इतरही अनेक क्षेत्रात गुंतवणूक केली आहे. Visvires Capital या कंपनीची स्थापना मूळचे भारतीय असलेल्या फ्रेंच व्यापारी रवि विश्वनाथन यांनी केली असून ते अंबानींचे जुने मित्र आहेत. रिलायन्सच्या खुलाशानुसार, 20 डिसेंबर 2017 रोजी Taut-la-Haut हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला होता. त्याच्या 2 आठवड्यापूर्वी म्हणजेच 5 डिसेंबर 2017 रोजी Visvires Capital कंपनीला 1.48 मिलियन्स युरोंचे अर्थसहाय्य रिलायन्स इंटरटेनमेंटकडून करण्यात आले होते. 

टॅग्स :रिलायन्सराफेल डीलफ्रान्स