नवी दिल्ली - देशातील प्रमुख प्रोफेशनल सर्व्हिस फर्म PwC इंडियाने मंगळवारी व्हिजन २०३० जारी करत पुढील ५ वर्षात २० हजार नोकऱ्या निर्माण करणार असल्याचं घोषित केले आहे. त्याशिवाय कंपनीचे उत्पन्न तीन पटीने वाढवण्याचा निर्धारही केला आहे.
PwC इंडिया कंपनी देशातील टियर २ आणि टियर ३ शहरांमध्येही लॉन्च केल्या जातील. ज्यातून अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहचून वेगाने वाढणाऱ्या स्पर्धेत टिकून राहता येईल. दरवर्षी कंपनीला त्यांच्या महसुलातील ५ टक्के तंत्रज्ञान, क्षमता विकसित करणे, कर्मचाऱ्यांचे कौशल्य वाढवणे यावर खर्च करणार आहे. याबाबत कंपनीचे चेअरमन संजीव कृष्णन म्हणाले की, आम्ही फ्यूचर रेडी वर्कफोर्स तयार करत आहोत. ज्यात महिलांच्या नेतृत्वाला प्राधान्य दिले जाईल. सर्वसमावेशक विकसित वातावरण तयार केले जाईल. आमचे लोक कॅम्पसपासून बोर्डरूमपर्यंत प्रगती करू शकतील असं त्यांनी सांगितले.
६ बड्या सेक्टरवर लक्ष केंद्रीत करणार
कंपनी आगामी काळात सहा प्रमुख सेक्टरवर लक्ष केंद्रीत करणार आहे. त्यात आर्थिक सेवा, हेल्थकेअर, इंडस्ट्रीयल, मॅन्युफॅक्चरिंग, ऑटो टेक्नोलॉजी, मिडिया आणि टेलीकॉम यांचा समावेश आहे. या क्षेत्रात येणाऱ्या काळात बिझनेस मॉडेल, व्यवस्थापन, तंत्रज्ञान आणि संशोधन याच्या वापरात मोठे बदल गरजेचे आहेत. त्यात मोठी संधी आहे असं कंपनीने म्हटलं.
दरम्यान, पुढील ५ वर्ष भारतासाठी निर्णायक असतील. त्यात PwC ला महत्त्वाची भूमिका निभावायची आहे. व्हिजन २०३० आमच्यासाठी भारताची विकसित क्षमता पुढे घेऊन जाणे आणि त्यासोबतच उद्योगात धाडसी बदल करण्याची वेळ आहे. आम्ही डिजिटल आणि तंत्रज्ञान क्षमतांना ऑफरमध्ये केंद्रस्थानी बनवत आहेत असंही कृष्णन यांनी म्हटलं. पीडब्ल्यूसी इंडियाचे उद्दिष्ट तंत्रज्ञान, एआय-आधारित डिलिव्हरी आणि नवीन बाजारपेठेच्या संधींमध्ये गुंतवणूक करून कर्मचारी संख्या ५०,००० पर्यंत वाढवून आपले लक्ष्य साध्य करण्याचे आहे.