Join us  

एकाच दिवसात तीन मोठे राजीनामे, 19 टक्यांनी आदळले 'या' कंपनीचे शेअर्स

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2022 8:15 PM

खरे तर, पीटीसी इंडिया फायनांशियल सर्व्हिसेसच्या बोर्डाच्या तीन स्वतंत्र संचालकांनी बुधवारी राजीनामे दिले होते. कॉर्पोरेट गव्हर्नन्सशी संबंधित कामे आणि इतर बाबींमुळे या तिघांनीही राजीनामे दिले. मात्र, याचा परिणाम त्याच्या स्टॉकवर दिसून आला. शेअरमध्ये तब्बल 19 टक्क्यांची घसरण नोंदवली गेली आहे.

पीटीसी इंडिया फायनांशियल सर्व्हिसेस (PTC India Fnancial Services)- कंपनीमध्ये सातत्याने राजीनामे पडत आहेत. यानंतर आता या कंपनीचे शेअर्सदेखील गडगडले आहेत. गुरुवारी कंपनीचे शेअर 18.32 टक्क्यांनी घसरून 20.95 रुपयांवर बंद झाला. तर सुरुवाती व्यापार सत्रात कंपनीच्या शेअरमध्ये 19 टक्क्यांहून अधिकची घसरण बघायला मिळाली.

खरे तर, पीटीसी इंडिया फायनांशियल सर्व्हिसेसच्या बोर्डाच्या तीन स्वतंत्र संचालकांनी बुधवारी राजीनामे दिले होते. कॉर्पोरेट गव्हर्नन्सशी संबंधित कामे आणि इतर बाबींमुळे या तिघांनीही राजीनामे दिले. मात्र, याचा परिणाम त्याच्या स्टॉकवर दिसून आला. शेअरमध्ये तब्बल 19 टक्क्यांची घसरण नोंदवली गेली आहे.

तीन स्वतंत्र संचालकांचा राजीनामा - कंपनीच्या या तीन स्वतंत्र संचालकांनी बुधवारी तडकाफडकी संचालक मंडळाचा राजीनामा दिला. कमलेश शिवाजी विकमसे, संतोष बी. नायर आणि थॉमस मॅथ्यू टी. अशी त्यांची नावे आहेत.

आपल्या राजीनाम्यात यांनी म्हटले होते की, कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि बोर्टाचे चेअरमन यांची काही कामे कंपनी कायदा, 2013 च्या तरतुदींच्या विरुद्ध आहेत. याचाच दुसरा अर्थ असा, की एकप्रकारे या तीनही स्वतंत्र संचालकांनी कंपनीच्या कारभारावरच प्रश्न उपस्थित केले आहे. 

CEO वर गंभीर आरोप -या तीनही स्वतंत्र संचालकांनी व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ पवन सिंह यांच्या नेतृत्वात पीएफएस इंडियाचे ज्या पद्धतीने व्यवस्थापन केले जात आहे, त्याबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली आहे. या स्वतंत्र संचालकांनी आपल्या राजीनाम्यात पवन सिंह हे आपल्या अधिकारांचा गैरवापर करत असल्याचा आरोपही केला आहे.

PFC मध्ये PTC इंडियाचे जवळपास 65% शेअर्स आहेत. जिच्यावर जवळपास 11,000 कोटी रुपयांचे कर्ज असण्याची शक्यता आहे. पीटीसी इंडिया लिमिटेड (पीटीसी)द्वारा संचलित पीएफएस, एक बिगर-बँकिंग वित्तीय कंपनी (NBFC) म्हणून आरबीआयकडे नोंदणीकृत आहे.

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारबाजार