Join us  

अरे व्वा! SBI सह अनेक बँका देणार घरबसल्या सुविधा; जाणून घ्या, नेमका कसा करून घ्यायचा फायदा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2021 5:45 PM

Bank News : तुम्ही बँकेच्या ई-सुविधा, ग्राहक कॉल सेंटर, वेब पोर्टल आणि मोबाइल अ‍ॅपद्वारे थेट बँकिंग सेवा घेऊ शकता.

नवी दिल्ली - भारतीय स्टेट बँक (SBI) सह देशातील सर्व सरकारी बँका घरबसल्या बँकिंग सेवा (Banking Services) उपलब्ध करुन देत आहेत. बँकांनी डोर स्टेप बँकिंगसाठी (Door Step Banking) टोल फ्री क्रमांक जारी केले आहेत. या नंबरवर कॉल करून तुम्ही घरातून बँकिंग सुविधेचा लाभ घेऊ शकता. ही बँकिंग सेवा सुरू झाल्यावर बँकेत जाऊन लांब रांगा लावण्याची गरज नाही. डोर स्टेप बँकिंगमध्ये बँका पैसे काढणे आणि जमा करणे यासह अनेक सुविधा देण्यात आल्या आहेत. 

बँकांच्या डोर स्टेप सेवेसाठी तुम्हाला बँकेच्या शाखेत नोंदणी करावी लागणार आहेत. तुम्ही बँकेच्या ई-सुविधा, ग्राहक कॉल सेंटर, वेब पोर्टल आणि मोबाइल अ‍ॅपद्वारे थेट बँकिंग सेवा घेऊ शकता. डोर स्टेप सेवा देण्यासाठी बँकांनी बँकिंग एजंट्सची नेमणूकही केली आहे. घरबसल्या कोणत्या प्रकारच्या सेवा देण्यात आल्या आहेत. ते जाणून घेऊया...

डोर स्टेप बँकिंग सेवेअंतर्गत मिळणार "या" सुविधा

- चेक/ड्राफ्ट/पे ऑर्डर (पिक-अप)

- नवीन चेक बुकसाठी मागणी स्लिप (पिक-अप)

- IT/GST चालान स्वीकृति (पिक-अप)

- फॉर्म 15G आणि 15H (पिक-अप)

- जारी केलेल्या सूचनांनुसार (पिक-अप)

- खाता विवरणी (डिलिव्हरी)

- फिक्स्ड डिपॉझिट पावत्या (डिलिव्हरी)

- TDS/फॉर्म 16 प्रमाणपत्र (डिलिव्हरी)

- ड्राफ्ट/पे-ऑर्डर (डिलिव्हरी)

- गिफ्ट कार्ड (डिलिव्हरी)

- रोख पैसे काढण्याची सेवा (डेबिट कार्ड / एईपीएस)

- जीवन प्रमाणपत्र

डोर स्टेप बँकिंग सेवेचा असा घ्या लाभ

डोर स्टेप बँकिंगबाबत अधिक माहिती हवी असल्यास www.psbdsb.in या अधिकृत वेबसाईटवर जा. तिथे संपूर्ण माहिती मिळेल. DSB mobile App च्या माध्यमातून ही डोर स्टेप बँकिंगची सुविधा घेता येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी टोल फ्री क्रमांक 1800 1037 188 किंवा 1800 1213 721 जारी करण्यात आले आहेत. या क्रमांकावर फोन करुन त्याय योजनेचा लाभ घेता येईल. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :एसबीआयबँकपैसा