Join us  

उभ्या पिकांचे ‘एआय’मुळे संरक्षण, ॲपमुळे शेतकऱ्यांच्या कमाईत भर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2023 9:49 AM

कीटकनाशकांवर होणारा खर्च २५ टक्के घटल्याचे समोर आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) आता पिकांचे रोगराईपासून संरक्षण करण्यासाठीही वापर होऊ लागला असून, त्यातून शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न मिळाल्याचे समोर आले आहे. त्यांचा कीटकनाशकांवर होणारा खर्चही घटल्याचे दिसून आले आहे. 

यासाठी बनविलेल्या ॲपबाबत वाधवानी एआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर शिवसुब्रमण्यम म्हणाले की, आम्ही उत्पादन वाढीसाठी एआय तंत्रज्ञान पुरवतो. कंपनीचे ‘कॉटन एस ॲप’ शेतकऱ्यांना किडींची ओळख पटवून  उपाय सुचवते. याच्या वापराने शेतकऱ्यांना लाभ झाला आहे.

कंपनीला २७.४२ कोटी रुपयांचे अनुदान 

या उपयुक्त तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यासाठी गुगल डॉट ओआरजीने पुढाकार घेतला असून ‘वाधवानी इन्स्टिट्यूट फॉर आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ला ३३ लाख डॉलर म्हणजेच सुमारे २७.४२ कोटी रुपयांचे अनुदान दिले आहे. या अनुदानातून तांदूळ, गहू आणि मका या पिकांना एआयचे संरक्षण उपलब्ध करून दिले जाईल. यामुळे शेतकऱ्यांचा अधिक फायदा होणार आहे.

खर्चात मोठी घट

पिकांच्या संरक्षणासाठी एआयच्या सहाय्याने तयार केलेल्या केलेल्या ॲपमुळे शेतकऱ्यांचा नफा २० टक्के वाढला  तर कीटकनाशकांवर होणारा खर्च २५ टक्के घटल्याचे समोर आले आहे.

 

टॅग्स :शेतकरी