Join us

व्याजदर कपातीसाठी रिझर्व्ह बँकेवर दबाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2019 06:21 IST

रिझर्व्ह बँकेने कपात केलेला व्याज दर बँकांनी अजून पूर्णपणे कर्जदारांपर्यंत पोहोचवलेला नसतानाही आर्थिक वाढीला आधार मिळावा यासाठी बँकर्स रिझर्व्ह बँकेवर तिने तिचे धोरण आणखी शिथिल करावे असा दबाब आणत आहेत

नवी दिल्ली : रिझर्व्ह बँकेने कपात केलेला व्याज दर बँकांनी अजून पूर्णपणे कर्जदारांपर्यंत पोहोचवलेला नसतानाही आर्थिक वाढीला आधार मिळावा यासाठी बँकर्स रिझर्व्ह बँकेवर तिने तिचे धोरण आणखी शिथिल करावे असा दबाब आणत आहेत.ठेवी आणि पत वाढ यांचा ताळमेळ कुठे निर्माण होत नसल्यामुळे तसेच छोट्या बचतीसाठी स्पर्धा वाढल्यामुळे बँकांना मोठ्या भांडवली खर्चाला तोंड द्यावे लागत आहे व परिणामी आर्थिक धोरण राबवण्याच्या त्यांच्या क्षमतेला मर्यादा पडत आहेत. बँकर्सचे म्हणणे असे आहे की, रिझर्व्ह बँकेने गेल्या फेब्रुवारी महिन्यात फेरखरेदीचा दर २५ बेसिस पॉर्इंटने कपात करून तो ६.२५ टक्के केला व ती सुरवात होती. परंतु, त्यामुळे कर्जावरील व्याजदरावर अगदीच नगण्य असा परिणाम होऊ शकेल.

टॅग्स :भारतीय रिझर्व्ह बँक