Join us

रोज २ रुपये भरा, ३ हजार पेन्शन मिळवा; जाणून घ्या कोणती आहे 'ही' योजना?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2021 08:23 IST

दररोज २ रुपये भरल्यानंतर वयाच्या ६०व्या वर्षापासून पेन्शन मिळण्यास सुरुवात होते

जीवनातील इतिकर्तव्यांची पूर्तता केली की निवृत्तीची ओढ लागते. मात्र, निवृत्तीनंतरही जगण्यासाठी पैसा लागतोच. त्यासाठी प्रत्येकजण आपापल्या परीने पैशांची तजवीज करून ठेवत असतो. असंघटित क्षेत्रातील कामगारांचे मात्र तसे नसते. त्यांचे पोट हातावर असते. अशांना धीर देणारी योजना केंद्राने २ वर्षांपूर्वी आणली. तिची लोकप्रियता वाढू लागली आहे.

काय आहे योजना?

प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना अर्थात पीएम-एसवायएम असे या योजनेचे नाव आहे. असंघटित क्षेत्रातील कामगारांना मासिक पेन्शन मिळावे, यासाठी २०१९ मध्ये ही योजना कार्यान्वित करण्यात आली. असंघटित क्षेत्रातील कामगारांना ६० वर्षे वयानंतर दरमहा ३००० रुपये पेन्शन देण्याची ही योजना आहे.

योजनेला प्रतिसाद कसा?

पीएम-एसवायएम योजनेला उदंड प्रतिसाद प्राप्त झाला आहे. आतापर्यंत या योजनेत असंघटित क्षेत्रातील ४५,७७,२९५ कामगारांनी नोंदणी केली आहे.

योजना अशी...दररोज २ रुपये भरल्यानंतर वयाच्या ६०व्या वर्षापासून पेन्शन मिळण्यास सुरुवात होते. दरमहा ३००० रुपये पेन्शन मिळण्याची तजवीज आहे. वयाच्या १८व्या वर्षापासूनही या योजनेत सहभागी होता येणार आहे. त्यासाठी दरमहा ५५ रुपये भरावे लागणार आहेत. १९ वर्षाच्या व्यक्तीला दरमहा १०० रुपये तर ४० वर्षे वयाच्या व्यक्तीला दरमहा २०० रुपये भरावे लागतील.

या व्यक्तींसाठी योजनाकामगार, ड्रायव्हर, घर कामगार, चर्मद्योगातील कामगार, रिक्षाचालक इत्यादी असंघटित क्षेत्रातील लोकांसाठी ही योजना आहे.