Join us
Daily Top 2Weekly Top 5

PPF वर घेऊ शकता कर्ज, कमी आहे व्याज आणि फेडणही सोपं

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2021 10:33 IST

PPF Loan : पब्लिक प्रोविडंट फंड अकाऊंटमध्ये गुतवणूकीचे अनेक फायदे आहेत. ज्यापैकी एक म्हणजे गरजेच्या वेळी कर्ज घेता येणं.

ठळक मुद्देवर्षातून एकदाच घेता येणार कर्जरक्कम टप्प्याटप्प्यात किंवा एकत्र भरण्याचीही मुभा

पब्लिक प्रोविडंट फंडमध्ये गुंतवणूकीचे अनेक फायदे आहेत. त्यापैकी एक म्हणजे गरजेच्या वेळी कर्ज घेण्याची मिळणारी सुविधा. तुम्ही तुमच्या पीपीएफ खात्यावरही कर्ज घेऊ शकता. याच्या मोबदल्यात तुम्हाला काहीही तारण ठेवावं लागत नाही. तसंच याचा व्याजदरही कमी असतो. याव्यतिरिक्त कर्जाची परतफेड करणंही सोपं असतं. ज्यावर्षी तुम्ही पीपीएफ खातं सुरू केलं त्याला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुम्ही कधीही कर्ज घेऊ शकता. पीपीएफ खातं उघडल्यानंतर एका वर्षानंतर पुढील पाच वर्षांपर्यंत तुम्ही कधीही कर्जासाठी अर्ज करू शकता. यामध्ये तुम्ही ज्या वर्षी कर्जासाठी अर्ज करत आहात. त्याच्या पूर्वी दोन वर्ष पूर्ण होण्याच्या अखेरिस जेवढी रक्कम खात्यात असते त्याच्या २५ टक्क्यांपर्यंत कर्ज घेता येतं. वर्षात एकदा कर्जजर कोणत्याही लहान मुलांच्या अथवा गतीमंद मुलांच्या नावे अकाऊंट सुरू केलं असेल तर त्याची काळजी घेणारी व्यक्ती त्याच्याकडून कर्जासाठी अर्ज करू शकते. यासाठी त्यांच्याकडून कार्यालयात एक सर्टिफिकेट जमा करावं लागेल. पीपीएफ खाते धारकांना पुन्हा कर्ज त्या व्यक्तीनं रक्कम व्याजासहित पूर्ण परत केल्यानंतरच दिलं जाईल. जर तुम्ही संपूर्ण रक्कम व्याजासहित परत केली नाही तर पुन्हा तुम्हाला कर्ज देण्यात येणार नाही. एका खातेधारकाला वर्षाला एकदाच कर्ज घेता येणार आहे. कर्ज आणि व्याजकर्जाच्या रकमेची मूळ रक्कम खातेधारकानं ज्या महिन्यात कर्ज घेतलं आहे त्यापासून ३६ महिने म्हणजेच तीन वर्ष पूर्ण होण्यापूर्वी करावं लागणार आहे. याची परतफेड तुम्ही एकावेळी किंवा टप्प्याटप्प्यानंही करू शकता. मूळ रक्कम फेडल्यानंतर खातेधारकाला मूळ रकमेच्या एक टक्का वार्षिक व्याजावर दोन टप्प्यांमध्ये व्याज द्यावं लागेल.जर एखाद्या खातेधारकानं ३६ महिन्यांच्या आत कर्जाची रक्कम फेडली नाही अथवा काही रक्कम शिल्लक असेल तर त्या शिल्लक रकमेवर वार्षिक सहा टक्क्यांचं व्याज द्यावं लागेल. ज्या महिन्यात कर्ज घेतलं आहे त्याच्या पुढील महिन्याच्या पहिल्या दिवसापासून ज्या महिन्यात कर्जाची शेवटची रक्कम फेडली जाईल त्या महिन्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत व्याज आकारलं जाईल.... तर खात्यातून पैसेजर कर्जाच्या रक्कमेवरील व्याज ३६ महिन्यांचा कालावधी पूर्ण होण्यापूर्वी फेडलं नाही तर प्रत्येक वर्षाच्या अखेरीस ते खात्यातून घेतलं जाईल. जर यादरम्यान खातेधारकाचा मृत्यू झाला तर त्याचा नॉमिनी अथवा त्याचा उत्तराधिकारी त्याचं व्याज फेडेल. जर तुमचं पीपीएफ खातं सक्रिय नसेल तर तुम्हाला त्यावर कर्ज घेता येणार नाही. जोपर्यंत तुमचं पहिलं कर्ज फेडलं जात नाही तोवर तुम्हाला पुढील कर्ज घेता येणार नाही. 

टॅग्स :व्यवसायबँकपीपीएफ