Join us  

पोस्टाची जबरदस्त योजना, FDहून जास्त व्याज अन् दुप्पट फायदा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2020 8:25 AM

दुसरीकडे बँक एफडी(FD) व्याजदरात कपात करीत असताना पोस्ट ऑफिस अनेक योजनांवर चांगले व्याज देत आहे.

जर आपण गुंतवणुकीचा चांगला पर्याय शोधत असाल तर पोस्टाच्या योजना आपल्यासाठी फायदेशीर ठरतील. ज्यामध्ये आपला पैसा सुरक्षित असेल आणि आपल्याला चांगला परतावा मिळेल. पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट खाते (Post Office Time Deposit Account)  हे आपल्या गुंतवणुकीसाठी एक चांगला पर्याय असू शकतो. कारण या योजनेत आपल्या पैशामध्ये चांगल्या परताव्यासह संरक्षणाची हमी मिळते. दुसरीकडे बँक एफडी(FD) व्याजदरात कपात करीत असताना पोस्ट ऑफिस अनेक योजनांवर चांगले व्याज देत आहे. त्यामुळे गुंतवणूक करून ग्राहक चांगले उत्पन्न मिळवू शकतात. आज आम्ही तुम्हाला या योजनेबद्दल माहिती देणार आहोत.व्याजदरजर आपण पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिटमध्ये एक ते तीन वर्षे गुंतवणूक केली, तर आपल्याला 5.5 टक्के दराने व्याज मिळेल. त्याच वेळी जर तुम्ही 5 वर्षे गुंतवणूक केली तर तुम्हाला 6.7 टक्के दराने व्याज मिळेल. तसेच आपल्याला 6.7 टक्के दराने व्याज मिळाल्यास, आपले पैसे 10.74 वर्ष म्हणजेच 129 महिन्यांत आपले पैसे दुप्पट होतील. तर बँकेला वर्षाकाठी 5.7 टक्के व्याज देऊन 12.63 वर्षे म्हणजे सुमारे 152 महिने लागतात.या योजनेशी संबंधित खास गोष्टी ...>> हे खाते एका अल्पवयीनाच्या नावे उघडले जाऊ शकते आणि दोन प्रौढांच्या नावावर एक संयुक्त खाते देखील उघडता येते.>> कोणतीही व्यक्ती टपाल कार्यालयात रोखीने किंवा धनादेशाद्वारे मुदत ठेव खाते उघडू शकते.>> ते खाते 6 महिन्यांपूर्वी बंद केले जाऊ शकत नाही. याशिवाय अकाली पैसे काढण्यावर दंड आहे. 6 ते 12 महिन्यांदरम्यान बंद केल्यास पोस्ट ऑफिस बचत खात्याचे व्याजदर देय असेल, जे दर वर्षी 4 टक्के आहे.>> आयकर कायदा 1961 च्या कलम 80 सीच्या खाली ५ वर्षांच्या मुदतीच्या ठेवीखाली गुंतवणूक करण्यासाठी कर सवलत मिळू शकते.>> पोस्ट ऑफिस एफडी खाते उघडण्यासाठी किमान १००० रुपये जमा करणे आवश्यक आहे. कोणतीही जास्तीत जास्त मर्यादा नाही.>> हे खाते कोणत्याही टपाल कार्यालयात उघडता येते. खाते उघडण्याच्या वेळी आणि खाते उघडल्यानंतरही नामनिर्देशन सुविधा उपलब्ध आहे.>> हे खाते एका पोस्ट ऑफिसमधून दुसर्‍या पोस्ट ऑफिसमध्ये सहजपणे ट्रान्सफर केले जाऊ शकते. 

टॅग्स :पोस्ट ऑफिससरकारी नोकरी