Join us  

पोस्टातल्या छोट्या बचतीवर हमखास मोठा फायदा, दररोज 200 रुपये वाचवून कमवा 21 लाख

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2019 12:03 PM

पोस्ट ऑफिस नवनव्या योजना या ग्राहकांच्या फायद्याच्या असतात.

नवी दिल्ली- पोस्ट ऑफिस नवनव्या योजना या ग्राहकांच्या फायद्याच्या असतात. पोस्ट ऑफिसच्या योजनांमध्ये गुंतवलेले पैसेही चांगला परतावा मिळवून देतो. पोस्टानंही एक अशीच योजना आणली आहे, ज्यात आपल्याला दिवसाला 200 रुपये वाचवून गुंतवणूक करायची आहे. यासाठी आपल्याला पब्लिक प्रॉव्हिडंट फंड खातं फायदेशीर ठरणार आहे. 

  • 15 वर्षीय पब्लिक प्रॉव्हिडंट फंड(पीपीएफ): या योजनेत 100 रुपयांपासून खातं उघडू शकता. खातेधारकांना या खात्यात पूर्ण आर्थिक वर्षात 500 रुपयांपासून जास्तीत जास्त 1.50 लाख रुपये जमा करावे लागतात. या खात्याची मर्यादा ही 15 वर्षांची आहे. या योजनेत संयुक्त खातंही उघडता येते. तसेच तुम्हाला या योजनेत नॉमिनेशनची सुविधाही मिळते. यात एका वित्त वर्षात तुम्हाला एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर चांगला फायदा मिळतो. डिसेंबरमध्ये समाप्त होणा-या तिमाहीसाठी पीपीएफमध्ये जमा असलेल्या रकमेवर प्रतिवर्षी 8 टक्के व्याज मिळते.
  • अशी करा गुंतवणूक- दररोज 200 रुपयांची पोस्टाच्या योजनेत बचत केल्यास मुदत संपेपर्यंत आपल्याला हातात 21 लाख रुपये येतात. समजा आपलं वय 25 वर्षं असून, 50 हजार पगार आहे. अशातच आपल्या दैनंदिन खर्चातील 200 रुपये वाचवून गुंतवणूक केल्यास 15 वर्षांनंतर आपल्याला 21 लाख रुपये मिळतात
  • कसा मिळणार 21 लाख रुपयांचा फायदा- जर आपण दैनंदिन व्यवहारातील 200 रुपये वाचवून गुंतवणूक केल्यास 6 हजार रुपये महिन्याला जमा होतात. अशा प्रकारे वर्षाला 72000 रुपयांची बचत होते. 15 वर्षांपर्यंत आपली एकूण गुंतवणूक 10.80 लाख रुपये होईल. पीपीएफवर 8 टक्के वार्षिक व्याज मिळतं. 15 वर्षांपर्यंत आपल्याला या रकमेवर व्याजासकट 21 लाख रुपयांचा परतावा मिळतो. म्हणजेच 15 वर्षांसाठी गुंतवलेल्या 10.31 लाख रुपयांवर व्याज मिळून 21 लाख रुपये मिळतात. 
  • पीपीएफ योजनेचे फायदे- पीपीएफ खात्याला एक प्रकारचं संरक्षण कवच प्राप्त असतं. यात आपल्याला नॉमिनी लावण्याची सुविधा मिळते. इन्कम टॅक्स अॅक्ट 80Cच्या तरतुदीअंतर्गत करातूनही सूट मिळते. या योजनेंतर्गत गुंतवलेल्या पैशांवर प्राप्तिकर लागत नाही. तसेच तीन वार्षिक वर्षानंतर आपण या खात्यावरून कर्जही घेऊ शकतो. 
टॅग्स :पोस्ट ऑफिससरकारी योजनापीपीएफ