Join us  

पोस्टातल्या गुंतवणुकीवर दर महिन्याला मिळणार 5,500 रुपये अन् 'हे' चार जबरदस्त फायदे

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2019 6:04 PM

पोस्ट ऑफिसमध्ये मासिक गुंतवणूक योजना म्हणजे पीओएमआयएसमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला फायदा मिळू शकतो.

नवी दिल्लीः  नवं वित्त वर्ष सुरू झाल्यास जास्त वेळ झालेला नाही. अशातच तुम्ही काही नवीन प्लॅनिंग करत असल्यास आपल्याला पोस्टातल्या सेव्हिंग योजना जास्त फायदेशीर ठरू शकतात. या योजनेतून महिन्याला भरभक्कम कमाईसुद्धा होते. ही योजना ज्यांना नोकरी व्यतिरिक्त कमाई करण्यासाठी लाभदायी ठरू शकते. पोस्ट ऑफिसमध्ये मासिक गुंतवणूक योजना म्हणजे पीओएमआयएसमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला फायदा मिळू शकतो. ही एक अशी योजना आहे ज्यात एकदाच मोठी रक्कम गुंतवण्यास जबरदस्त फायदा मिळतो. तसेच महिन्याला ठरावीक रक्कमही आपल्याला मिळते. विशेष म्हणजे यात आपल्याला 4 जबरदस्त फायदे मिळतात. 

  • मिळतात चार फायदे- हे खातं कोणीही उघडू शकते. तसेच आपण जमा केलेल्या रकमेचीही हमी मिळते. बँक एफडी आणि इतर योजनांच्या तुलनेत या योजनेत गुंतवणूक केल्यास चांगला फायदा मिळतो. या योजनेत दर महिन्याला निश्चित रक्कम आपल्याला मिळते आणि मुदत संपल्यानंतर सर्व रक्कम आपल्याला परत मिळते. जेणेकरून आपण पुन्हा या योजनेतील पैसे गुंतवू शकतो. 
  • आपल्या मुलांसाठी उघडा खाते- आपण आपल्या मुलांच्या नावेसुद्धा खातं उघडू शकतो. जर मुलगा 10 वर्षांचा असेल, तर त्याच्या नावे आई-वडील खातं उघडू शकतात आणि आई-वडील ते हाताळू शकतात. तसेच मुलगा 10 वर्षांचा झाल्यानंतर तो स्वतः ते खातं ऑपरेट करू शकतो. त्यासाठी आपल्याला आधार कार्ड, व्होटर आयडी, पॅन कार्ड, रेशन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्ससारखा पुरावा द्यावा लागणार आहे. तसेच दोन पासपोर्ट साइज फोटोंचीही आवश्यकता आहे.  या योजनेत कोणीही खातं उघडू शकतो. जर आपण सिंगल खातं उघडलं, तर यात 4.5 लाख रुपयांहून अधिक रक्कम जमा करता येते. यात कमीत कमी 1500 रुपयांची रक्कम जमा करावी लागते. जर आपलं खातं संयुक्त असल्यास आपल्याला 9 लाख रुपयांपर्यंत पैसे जमा करावे लागतात. 
  • मिळणार टॅक्समधून सूट- या योजनेत गुंतवलेल्या रकमेत आपल्याला टॅक्समधून सूट मिळणार आहे. या योजनेतून मिळालेल्या परताव्यात कोणताही टीडीएस कापला जात नाही. 
  • दर महिन्याला मिळणार पगार- दह महिन्याला या योजनेतून आपल्याला हक्काचा पगार मिळणार आहे. या योजनेवर 7.3 टक्के वार्षिक व्याज मिळतं. जर आपण 9 लाख रुपये जमा केलेले असल्यास आपल्याला वर्षाला 65700 रुपये मिळतात. अशा प्रकारे आपल्याला 5500 रुपये दर महिन्याला मिळणार आहेत.
    तसेच 9 लाख रुपये गुंतवलेल्या योजनेची मर्यादा संपल्यास आपल्याला पुन्हा ती रक्कम व्याजासकट मिळणार आहे. जर आपण दर महिन्याला ते 5500 रुपये न काढल्यास तेसुद्धा त्या रकमेत समाविष्ट होणार आहेत. या योजनेचा मॅच्युरिटी पीरियड 5 वर्षांचा आहे. 5 वर्षांनंतर तुम्ही पुन्हा या योजनेत पैसे गुंतवू शकता.  
टॅग्स :पोस्ट ऑफिस