Join us  

5 वर्षांसाठी गुंतवणूक करा अन् मिळवा 10 लाख रुपयांचा विमा, पोस्टाच्या दोन जबरदस्त योजना

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2019 4:55 PM

पोस्टाच्या अशा अनेक योजना आहेत, ज्यात गुंतवणूक केल्यास जबरदस्त फायदा मिळतो.

नवी दिल्लीः पोस्टाच्या अशा अनेक योजना आहेत, ज्यात गुंतवणूक केल्यास जबरदस्त फायदा मिळतो. विशेष म्हणजे पोस्ट ऑफिस आपल्याला विमा संरक्षणही पुरवते. भारतात जेव्हा ब्रिटिशांची सत्ता होती तेव्हा 1 फेब्रुवारी 1884ला Postal Life Insurance ही योजना ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली होती. सद्यस्थितीत PLI (Postal Life Insurance) योजनेंतर्गत 43 लाखांहून अधिक पॉलिसी धारक आहेत. या योजनेंतर्गत तुम्ही 10 लाखांपर्यंतच विमा संरक्षणही मिळवू शकता. पोस्ट ऑफिसच्या विमा संरक्षण योजनांची तुम्हाला आम्ही माहिती उपलब्ध करून दिली आहे.   

  • Convertible Whole Life Insurance (सुविधा)

Postal Life Insuranceच्या या योजनेंतर्गत तुम्हाला चांगला फायदा मिळतो. पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर तुम्ही विमा संरक्षण पॉलिसी Endowment Assuranceमध्ये बदलू शकता. परंतु पॉलिसीचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर बदलू पाहणा-या विमा संरक्षण प्राप्त करणा-या व्यक्तीचं वय 55 वर्षांहून अधिक असता कामा नये. तुम्ही ती पॉलिसी पाच वर्षांनंतर न बदलल्यास त्या पॉलिसीला Whole Life Assurance समजलं जाणार आहे. तीन वर्षांच्या आत तुम्ही ही पॉलिसी परत करू शकता. तुम्ही पॉलिसीवर कर्ज घेतलं असेल आणि ती परत केल्यास तुम्हाला बोनस मिळणार नाही. 

  • Anticipated Endowment Assurance (सुमंगळ)

Postal Life Insuranceच्या या योजनेला सुमंगळ नावानं सुद्धा ओळखलं जातं. ही योजना 5 लाख रुपयांहून अधिक रक्कम गुंतवल्यास फायदा होतो, तसेच ही एक मनी बॅक पॉलिसी आहे. ज्यांना वेळोवेळी परताव्याची आवश्यकता अशते त्यांना या पॉलिसीचा फायदा होईल. प्रत्येक वेळी त्यांना Survival Benefits मिळणार आहे. विमा संरक्षण घेतलेल्या व्यक्तीचं अकाली मृत्यू झाल्यास त्यांच्या पॉलिसीची सर्व रक्कम त्याच्या उत्तराधिका-याला(nominee) मिळणार आहे. Postal Life Insuranceच्या या प्लॅनअंतर्गत पॉलिसी 15 वर्ष आणि 20 वर्षांच्या कालावधीपर्यंत उपलब्ध आहे. 15 वर्षांची विमा संरक्षण पॉलिसी घेतल्यास 6 वर्षांमध्ये 20 टक्के, 9 वर्षांच्या पॉलिसीवर 20 टक्के, 12 वर्षांच्या पॉलिसीवर 20 टक्के, आणि 15 वर्षांच्या पॉलिसीवर 40 टक्के बोनस मिळणार आहे. 

टॅग्स :पोस्ट ऑफिस