Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘मुहुरत’ सत्र नकारात्मक ठरण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2018 05:42 IST

शेअर बाजारातील सध्याची स्थिती पाहता लक्ष्मीपुजनानिमित्त बुधवारी होणारे विशेष ‘मुहुरत’ सत्र यंदा नकारात्मक ठरण्याची शक्यता आहे. तरीही तांत्रिक क्षेत्रातील कंपन्यांचे समभाग वधारतील, असे अभ्यासकांचे मत आहे.

मुंबई  - शेअर बाजारातील सध्याची स्थिती पाहता लक्ष्मीपुजनानिमित्त बुधवारी होणारे विशेष ‘मुहुरत’ सत्र यंदा नकारात्मक ठरण्याची शक्यता आहे. तरीही तांत्रिक क्षेत्रातील कंपन्यांचे समभाग वधारतील, असे अभ्यासकांचे मत आहे.शेअर बाजारात दरवर्षी लक्ष्मीपूजनानिमित्त दीड तासांचे विशेष सत्र होते. या सत्रात दमदार खरेदी होऊन बाजार वधारण्याची गुंतवणूकदारांना अपेक्षा असते.पण गेल्या वर्षी ‘मुहुरत’ सत्रात बाजार घसरला होता. या सत्रात झालेल्या समभागांच्या खरेदीचा परतावासुद्धा आधीपेक्षा कमी होता. त्यामुळे यंदा या सत्राबाबत गुंतवणूकदारांमध्ये पुन्हा साशंकता आहे.

टॅग्स :शेअर बाजारनिर्देशांक