Join us

विकली जाणार SUBWAY, ५८ वर्षांपूर्वी दोन मित्रांनी केलेली सुरुवात; वाचा कोण खरेदी करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2023 13:36 IST

सँडविच, सॅलड आणि फास्ट फूडची सुप्रसिद्ध कंपनी सबवे (SUBWAY) आता विकली जाणार आहे.

सँडविच, सॅलड आणि फास्ट फूडची सुप्रसिद्ध कंपनी सबवे (SUBWAY) आता विकली जाणार आहे. अमेरिकन फास्ट फूड कंपनी इक्विटी फर्म रोर्क कॅपिटल ही सबवेला खरेदी करणारे. दोघांमध्ये ९.५५ अब्ज डॉलरचा करार झालाय. रोर्क कॅपिटल व्यतिरिक्त आणखी तीन कंपन्यांनी सबवेच्या खरेदी करण्यासाठी बोली लावली होती. पण अखेर, सर्वाधिक बोली लावणाऱ्या रोर्क कॅपिटलनं यात बाजी मारलीये.नफ्यात होती, तरीही विक्रीगेल्या अनेक वर्षांपासून सबवे नफ्यात होती. कंपनीची सातत्यानं ग्रोथही होत होती. परंतु वाढत चाललेली आव्हानं आणि वाढत्या खर्चाच्या पार्श्वभूमीवर कंपनीनं सबवेच्या  विक्रीचा निर्णय घेतला. सबवेचा व्यवसाय जगातील १०० हून अधिक देशांमध्ये पसरलेला आहे. त्यांचे जगभरात ३७००० हून अधिक आउटलेट आहेत. या करारानंतर या क्षेत्रातील रोर्क कॅपिटलचा दबदबा आणखी वाढणार आहे. कंपनीकडे जिमी जोन्स, ऑर्बीज, बास्किन रॉबिन्स आणि बफेलो वाइल्ड विंग्स सारखी फूड चेन आहे. कंपनीची संपत्ती ३७ अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक आहे.१७ वर्षीय मुलानं केलेली सुरुवात१९६५ मध्ये ब्रिजपोर्ट कनेक्टिकट येथून सबवेची सुरुवात झाली. १७ वर्षीय फ्रेड डेलुका यांनं कंपनीची स्थापना केली. फ्रेड आणि त्याचा मित्र पीटर बक यांनी वयाच्या १७ व्या वर्षी त्यांचा ब्रँड सुरू केला, जो काही वर्षांतच जगातील प्रमुख ब्रँडपैकी एक बनला. कंपनीचा व्यवसाय शंभरहून अधिक देशांमध्ये पसरला आहे. पण त्यांना पॉपिज आणि चिक-फिल-ए सारख्या कंपन्यांकडून मिळणाऱ्या मोठ्या स्पर्धेला सामोरं जावं लागत होतं.

टॅग्स :व्यवसाय