Join us  

Policybazaar IPO : आणखी एक IPO येणार, मालामाल करणार; पॉलिसीबाझार 6500 कोटी जमविणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2021 6:27 PM

Policybazaar IPO launch soon: पीबी फिनटेक ही गुरुग्रामची कंपनी आहे. ती पॉलिसीबाझारच्या बँडद्वारे व्यापार करते. कंपनीच्या संचालकांनी बोर्ड मिटिंगमध्ये आयपीओला परवानगी दिली होती. तसेच पीबी फिनटेकला प्रायव्हेट लिमिटेड पासून पब्लिक लिमिटेड बनवण्यास परवानगी देण्यात आली आहे. 

पॉलिसीबाझारची मूळ कंपनी पीबी फिनटेक (PB Fintech) ने आयपीओ जारी करण्याचा प्लॅन आखला आहे. कंपनी याद्वारे 6,500 कोटी रुपये गोळा करू शकते. यामुळे यंदा आयपीओ आणणारी ही पाचवी भारतीय स्टार्टअप कंपनी होऊ शकते. (Policybazaar plans IPO to raise up to Rs 6,500 crore)

पॉलिसीबाझार (Policybazaar) ही एक ऑनलाईन इन्शुरन्स अॅग्रीगेटर आहे. या प्लॅटफॉर्मवर ग्राहक विमा कंपन्यांची उत्पादने आणि त्यांची सर्व प्रकारची माहिती मिळवता येते. या कंपनीला विमा पॉलिसी विकण्याचाही परवाना मिळाला आहे. या वेबसाईटवर कोणती पॉलिसी स्वस्त कोणती महाग, कोणत्या पॉलिसीमध्ये काय काय सेवा मिळतात याची माहिती मिळते. पॉलिसीबाझारमध्ये जपानच्या सॉफ्टबँकेने (softbank) गुंतवणूक केली आहे. 

सुत्रांनुसार पीबी फिनटेक (PB Fintech) लवकरच सेबीकडे DRHP दाखल करण्याची शक्यता आहे. कंपनी डिसेंबरपर्यंत आपला आयपीओ आणणार आहे. कंपनीच्या आयपीओमध्ये नवीन शेअर उपलब्ध केले जाणार आहेत. ऑफर फॉर सेलद्वारे कंपनीचे गुंतवणूकदार थेट शेअर बाजारात त्यांचे शेअर विकू शकणार आहेत. 

पीबी फिनटेक ही गुरुग्रामची कंपनी आहे. ती पॉलिसीबाझारच्या बँडद्वारे व्यापार करते. कंपनीच्या संचालकांनी बोर्ड मिटिंगमध्ये आयपीओला परवानगी दिली होती. तसेच पीबी फिनटेकला प्रायव्हेट लिमिटेड पासून पब्लिक लिमिटेड बनवण्यास परवानगी देण्यात आली आहे. पीबी फिनटेकला 2019-20 मध्ये 218 कोटी रुपयांचे नुकसान झाले होते. 2018-19 मध्ये 213 कोटी रुपयांचे नुकसान झाले होते. 2020-21 चे निकाल जाहीर करण्यात आलेले नाहीत.

टॅग्स :शेअर बाजारइनिशिअल पब्लिक ऑफरिंग