PNG Gas Connection Step By Step Procedure: केंद्र सरकार देशभरात गॅस नेटवर्कचा विस्तार करण्यासाठी आणि एकाच इंधनावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी नवीन प्रयत्न करत आहे. याअंतर्गत एक नवीन धोरण आणलं गेलं आहे, ज्यानुसार ज्या भागात पाईप्ड नॅचरल गॅसची (PNG) सुविधा उपलब्ध आहे, तिथे जर लोक PNG कडे वळले नाहीत, तर त्यांचं LPG कनेक्शन बंद केलं जाऊ शकतं.
मध्य पूर्वेतील संकटामुळे जागतिक तेल पुरवठ्यात आलेल्या अडचणींच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. सरकार घरगुती आणि व्यावसायिक वापरासाठी PNG ला अधिक विश्वासार्ह पर्याय म्हणून प्रोत्साहन देत आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने २०२६ मध्ये हा आदेश जारी केला आहे. सरकारच्या मते, PNG द्वारे सतत पुरवठा मिळतो आणि वारंवार गॅस सिलिंडर भरण्याची गरज भासत नाही. यामुळे ऊर्जा सुरक्षा वाढेल आणि सिलिंडर पुरवठ्याशी संबंधित समस्याही कमी होतील.
हॉटेल-रेस्टॉरंटमध्ये ग्राहकांकडून वसूल केला जातोय LPG चार्ज; CCPA चा कडक कारवाईचा इशारा, प्रकरण काय?
PNG कनेक्शन कसं घ्यावं?
PNG कनेक्शनसाठी या सोप्या स्टेप्स फॉलो करा:
- तुमच्या स्थानिक गॅस कंपनीच्या वेबसाइटला भेट द्या (उदा. IGL किंवा MGL).
- “New PNG Connection” सेक्शनमध्ये जा.
- तुमची माहिती आणि पत्ता भरा.
- आवश्यक कागदपत्रं अपलोड करा (उदा. आधार, पत्त्याचा पुरावा).
- फी जमा करा.
- अर्ज सबमिट करून रेफरन्स नंबर नोंदवून ठेवा.
- याच प्रक्रियेनंतर कंपनी तुमच्या कागदपत्रांची पडताळणी करून इन्स्टॉलेशनची तारीख निश्चित केली जाईल.
PNG कनेक्शनसाठी आवश्यक कागदपत्रे
- ओळखपत्र (कोणतेही एक): आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट किंवा ड्रायव्हिंग लायसन्स.
- पत्त्याचा पुरावा (कोणतेही एक): वीज बिल, BSNL बिल, रेंट एग्रीमेंट, रेशन कार्ड किंवा मालमत्ता कर पावती.
- मालकी हक्काचा पुरावा: प्रॉपर्टी पेपर, सोसायटी लेटर, शेअर सर्टिफिकेट किंवा टॅक्स पावती.
- भाडेकरूंसाठी: घरमालकाचं ना-हरकत प्रमाणपत्र (NOC) आणि त्यांची कागदपत्रं.
- इतर: पासपोर्ट साईज फोटो.
PNG सामान्यतः स्वस्त असतो कारण यामध्ये तुम्ही जेवढा गॅस वापरता तेवढंच बिल येतं. याउलट, LPG मध्ये प्रत्येक वेळी पूर्ण सिलिंडर विकत घ्यावा लागतो, ज्यामुळे खर्च जास्त होऊ शकतो.
LPG बुकिंगमध्ये समस्या आल्यास काय करावं?
मोबाईल ॲप, वेबसाइट, SMS किंवा कॉल (IVRS) द्वारे बुक करा.तुमचा नोंदणीकृत मोबाईल नंबर चालू ठेवा.गॅस एजन्सीशी संपर्क साधा.कस्टमर केअरची मदत घ्या.
LPG डिलिव्हरी न मिळाल्यास काय करावं?
- २-३ दिवस वाट पाहा.
- गॅस एजन्सीकडून स्टेटस जाणून घ्या.
- हेल्पलाइन नंबरवर कॉल करा.
- वेबसाइट किंवा ॲपवर तक्रार नोंदवा.
- जास्त उशीर झाल्यास तक्रार पुढे पाठवा.
- तुम्ही पेट्रोलियम मंत्रालयाच्या पोर्टलवर किंवा CPGRAMS वर देखील तक्रार करू शकता.
हेल्पलाइन नंबरइंडियन ऑइल: १८००-२३३३-५५५भारत पेट्रोलियम: १८००-२२-४३४४हिंदुस्तान पेट्रोलियम: १८००-२३३३-५५५आयजीएल: १८००-१०२-५१०९एमजीएल: १८००-२२-९९४४
Web Summary : Get PNG gas easily! Apply online with simple steps, submit documents, and enjoy continuous gas supply, saving on cylinder costs. LPG help available.
Web Summary : पीएनजी गैस कनेक्शन आसानी से पाएं! ऑनलाइन आवेदन करें, दस्तावेज जमा करें और सिलेंडर के खर्च से बचें। एलपीजी सहायता उपलब्ध है।