Gautam Adani Latest News: पायाभूत सुविधा उभारण्यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्हिजनचे अदाणी समूहाचे चेअरमन गौतम अदानींनी व्यक्त केल्या. पंतप्रधान मोदींच्या दूरदृष्टीतून प्रेरणा घेऊन आसामच्या विकासात आम्ही आपली भागीदारी करण्यास कटिबद्ध आहे, असे गौतम अदानी यांनी म्हटले आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
आसाममध्ये आयोजित बिझनेस परिषदेचे आयोजन करण्या आले आहे. या कार्यक्रमात गौतम अदानी यांनी संबोधित केले. मोदींच्या नेतृत्वाबद्दल बोलताना गौतम अदानी म्हणाले की, 'मी जेव्हा-जेव्हा पंतप्रधान मोदींना भेटतो, तेव्हा-तेव्हा मला प्रेरणाच मिळते.'
अदानी म्हणाले, 2003 पासून याची सुरूवात झाली
गौतम अदानी गुंतवणूक परिषदेत बोलताना म्हणाले की, 'पंतप्रधान मोदींच्या या व्हिजनची सुरूवात २००३ मध्ये गुजरातपासून झाली. व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिटमध्ये मोदींचं व्हिजन स्पष्टपणे दिसलं होतं. एक ठिणगी पडली आणि आज त्याचं राष्ट्रीय आंदोलन झालं आहे. याने देशातील सर्व राज्यांना प्रेरणा दिली. सर्वच राज्यांनी गुंतवणूक आणि आर्थिक परिवर्तन स्वीकारले', असे गौतम अदानी यांनी सांगितले.
अदानी समूह ५०,००० कोटींची गुंतवणूक करणार
आसाममधील गुंतवणूक परिषदेत गौतम अदानी यांनी मोठी घोषणा केली. अदानी समूह आसाममध्ये ५० हजार कोटी गुंतवणूक करेल. आसामच्या विकासात अदानी समूह महत्त्वाचं योगदान देईल. अदानी समूह विमानतळे, एअररोसिटी, गॅस, रस्ते विकास यांच्या विकासावर लक्ष्य केंद्रीत करेल. यातून रोजगाराच्या हजारो संधी निर्माण होतील, असा विश्वास गौतम अदानी यांनी व्यक्त केला.