PM Internship Scheme: केंद्र सरकारद्वारे देशातील नागरिकांसाठी अनेक प्रकारच्या योजना राबवल्या जात आहेत. यापैकीच एक योजना म्हणजे 'पंतप्रधान इंटर्नशिप योजना' (PM Internship Scheme). या योजनेचा मुख्य उद्देश देशातील तरुणांना कंपन्यांमध्ये इंटर्नशिप मिळवून देणं हा आहे. आता सरकारनं या योजनेत मोठे बदल केलेत. या नवीन बदलांमुळे आता जास्तीत जास्त तरुण या योजनेत सहभागी होऊ शकतील आणि अधिक कंपन्यांमध्ये इंटर्नशिपच्या संधी मिळवू शकतील.
पंतप्रधान इंटर्नशिप योजनेत झालेले बदल
पंतप्रधान इंटर्नशिप योजनेत आता सेमीकंडक्टर, रिन्यूएबल एनर्जी आणि ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्स यांसारख्या नवीन क्षेत्रांतील कंपन्यांचाही समावेश केला जात आहे. पूर्वी या योजनेत सहभागी होण्यासाठी कंपन्यांना सीएसआर (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी) खर्च करणं अनिवार्य होते, परंतु आता हा नियम काढून टाकण्यात आला आहे. म्हणजेच आता सीएसआर नसलेल्या कंपन्या देखील या योजनेत सहभागी होऊन तरुणांना इंटर्नशिप देऊ शकतील.
याशिवाय, नियमांमध्ये सवलत दिल्यानं आता अधिक तरुण यात अर्ज करू शकतील. कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयानं उमेदवारांसाठीचे नियम सोपे केले असून स्टायपेंडमध्येही वाढ केली आहे.
शेअर बाजारात आज मोठा भूकंप का झाला? काही तासांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
उमेदवारांसाठी नवीन पात्रता आणि अटी
शैक्षणिक पात्रता : आता पोस्ट ग्रॅज्युएट आणि MBA झालेले विद्यार्थी देखील अर्ज करू शकतील.
वयोमर्यादा : किमान वय २१ वर्षांवरून कमी करून १८ वर्ष करण्यात आलं आहे, तर कमाल वय २४ वर्षांवरून वाढवून २५ वर्ष करण्यात आलंय.
स्टायपेंड : स्टायपेंड ५,००० रुपयांवरून वाढवून ९,००० रुपये करण्यात आलंय.
कालावधी : इंटर्नशिपचा कालावधी १ वर्षाऐवजी आता ६ किंवा ९ महिने करण्यात आला आहे. कंपन्या आता वर्षभरात कधीही इंटर्नशिपसाठी जाहिरात देऊ शकतील.
पंतप्रधान इंटर्नशिप योजनेचा तिसरा टप्पा
पंतप्रधान इंटर्नशिप योजनेच्या तिसऱ्या टप्प्याचं काम सुरू झालं असून, यामध्ये सुमारे १ लाख तरुणांना इंटर्नशिप देण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय. आतापर्यंत १९ क्षेत्रं आणि ३२ राज्यांमध्ये १५,५०० हून अधिक इंटर्नशिपच्या संधी उपलब्ध आहेत.
Web Summary : The PM Internship Scheme now includes new sectors like renewable energy. CSR requirement removed, allowing more companies to participate. Age limits adjusted (18-25), stipend increased to ₹9,000, and internship duration flexible (6-9 months). Aim: 1 lakh internships.
Web Summary : पीएम इंटर्नशिप योजना में नवीकरणीय ऊर्जा जैसे नए क्षेत्र शामिल। सीएसआर की अनिवार्यता हटी, जिससे अधिक कंपनियां भाग ले सकें। आयु सीमा समायोजित (18-25), स्टाइपेंड बढ़कर ₹9,000, और इंटर्नशिप अवधि लचीली (6-9 महीने)। लक्ष्य: 1 लाख इंटर्नशिप।