Piyush Goyal On Startup Ecosystem: एका कार्यक्रमात बोलताना केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी भारतीय स्टार्टअप इकोसिस्टमवर एक वक्तव्य केलं होतं. भारतीय स्टार्टअप्स फूड डिलिव्हरी आणि ई-कॉमर्ससारख्या सेवांपुरते मर्यादित आहेत, तर चीन बॅटरी तंत्रज्ञान, एआय आणि सेमीकंडक्टर डेव्हलपमेंटमध्ये गुंतवणूक करत असल्याचं म्हटलं. यानंतर नवीन वादाला तोंड फेटले. गोयल यांच्या या वक्तव्यांचा कार्पोरेट क्षेत्रातील अनेकांनी समाचार घेतला. सोशल मीडियावरही गोयल यांच्याविरोधात राळ उठलेली पाहायला मिळाली. यानंतर गोयम यांनी एक पाऊल मागे घेत नवीन घोषणा केली आहे.
स्टार्टअप्ससाठी 'हेल्पलाइन नंबरवाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी शनिवारी भारतीय स्टार्टअप्ससाठी हेल्पलाइन डेस्कची घोषणा केली. जेणेकरून नवीन उद्योजकांना कोणत्याही प्रकारची अडचण येत असेल किंवा सरकारला कोणत्याही प्रकारची सूचना द्यायची असेल किंवा त्यांची तक्रार नोंदवायची असेल तर ते या हेल्पलाइन डेस्कचा वापर करू शकतील. फूड डिलिव्हरी आणि बेटिंग, फॅन्टसी स्पोर्ट्स ॲप्सवर अनेक स्टार्टअप्सचे लक्ष केंद्रित करण्यासाठी केंद्रीय मंत्र्याने या हेल्पलाइनची घोषणा केली आहे.
सर्व स्टार्टअपसाठी सोयराष्ट्रीय राजधानी दिल्लीतील स्टार्टअप महाकुंभ कार्यक्रमात बोलताना केंद्रीय मंत्री गोयल यांनी सांगितले, की देशभरातील कोणत्याही स्टार्टअपसाठी सूचना देण्यासाठी किंवा तक्रारी नोंदवण्यासाठी ही हेल्पलाइन खुली असेल. ते म्हणाले की, जर स्टार्टअप सुरू करण्यासाठी तुमच्याकडे कोणी लाच मागितली किंवा कोणत्याही प्रकारची बेकायदेशीर गोष्ट घडत असेल तर ते थेट या हेल्पलाइनचा वापर करू शकतात. पियुष गोयल यांच्या म्हणण्यानुसार, 'तुम्ही काही चुकीचे केलेले नाही आणि कायद्याच्या कक्षेत राहून काम केले आहे, असे तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही हेडलाइनद्वारे तक्रार करू शकता.'
जर कोणताही अधिकारी तुम्हाला त्रास देत असेल किंवा कायद्यातील कोणत्याही बदलाबाबत तुम्हाला कोणतीही सूचना द्यायची असेल किंवा भारताच्या कायदेशीर कक्षेत येत नसलेले कोणतेही उत्पादन किंवा तंत्रज्ञान ध्वजांकित करायचे असेल तर तुम्ही त्या हेल्पलाइनशी संपर्क साधू शकता.
मंत्री गोयल स्टार्टअप इकोसिस्टमबद्दल काय म्हणाले होते?देशातील अनेक स्टार्टअप्स फूड डिलिव्हरी आणि बेटिंग, फॅन्टसी स्पोर्ट्स ॲप्सवर अधिक लक्ष केंद्रित करत आहेत, तर चीनमध्ये ते ईव्ही, बॅटरी तंत्रज्ञान, सेमीकंडक्टर आणि एआयवर काम करत आहेत, अशी टिपण्णी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी केली होती. तंत्रज्ञानाच्या प्रगतीसाठी प्रयत्न करण्याऐवजी कमी पगाराच्या गिग नोकऱ्यांमध्ये देश समाधानी आहे का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला होता.
वाचा - नेत्यांना रिअॅलिटी चेकची गरज, आदित पलिचांनंतर अशनीर ग्रोव्हर यांचाही पीयूष गोयलांवर निशाणा
"आपण फक्त आइस्क्रीम आणि चिप्स? बनवणार आहोत का? की फक्त दुकानदारी करायची आहे? डिलिव्हरी बॉईज आणि मुली बनून आपल्याला आनंद होईल का? हीच भारताची क्षमता आहे का? असा थेट प्रश्न नवउद्योजकांना विचारले होते. पुढे ते म्हणाले, हा काही स्टार्टअप नाही. भारतीय स्टार्टअप्सना वास्तविकता तपासण्याची गरज आहे. आज भारतातील स्टार्टअप्स काय आहेत? मात्र, गोयल यांच्या या वक्तव्यावर अनेक उद्योगपतींनी टीका केली होती.