Join us  

PhonePe युजर्संना झटका! आता अशाप्रकारे पैसे अ‍ॅड करणे झाले महाग

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2021 9:19 AM

PhonePe : अनेक युजर्स क्रेडिट कार्डवरून (Credit Card)फोनपे वॉलेटमध्ये पैसे टाकून छोटे -मोठे व्यवहार करतात. आता फोनपे वॉलेट युजर्ससाठी एक वाईट बातमी आहे.

नवी दिल्ली : तुम्ही किराणा दुकानातून माल खरेदी करण्यासाठी, पाणी आणि वीज बिल भरण्यासाठी, गॅस सिलेंडर बुक करण्यासाठी, मोबाईल आणि डीटीएच रिचार्ज करण्यासाठी किंवा ऑनलाईन ऑर्डर करण्यासाठी फोनपे वॉलेट (PhonePe Wallet) वापरता. अनेक युजर्स क्रेडिट कार्डवरून (Credit Card)फोनपे वॉलेटमध्ये पैसे टाकून छोटे -मोठे व्यवहार करतात. आता फोनपे वॉलेट युजर्ससाठी एक वाईट बातमी आहे. दरम्यान, आता फोनपे (PhonePe) वापरणे महाग झाले आहे. (phonepe users to pay extra charge on using credit cards to top up wallets)

2 टक्क्यांपेक्षा जास्त शुल्कफोनपे (PhonePe)अ‍ॅपवर दिलेल्या माहितीनुसार, आता जर युजर्संनी क्रेडिट कार्डमधून फोनपे वॉलेटमध्ये 100 रुपये अ‍ॅड केले तर त्यांना 2.06 टक्के (जीएसटीसह) अतिरिक्त शुल्क भरावे लागेल. त्याचप्रमाणे, जर त्याने क्रेडिट कार्डद्वारे 200 रुपये जोडले तर त्याला 4.13 टक्के (जीएसटीसह) अतिरिक्त शुल्क आकारले जात आहे. तसेच, 300 रुपये अॅड केले, तर त्याला 6.19 टक्के (जीएसटीसह) अतिरिक्त शुल्क आकारले जात आहे. दरम्यान, हा नियम नुकताच अंमलात आला आहे. मात्र, फोनपे वॉलेटमध्ये यूपीआय आणि डेबिट कार्डद्वारे पैसे अ‍ॅड करण्यासाठी कोणतेही शुल्क नाही.

PhonePe वर मिळवू शकता विमा कंपन्यांचे प्रोडक्ट्सजीवन विमा आणि सामान्य विमा उत्पादने विकण्यासाठी आयआरडीएकडून (IRDA)तत्त्वतः मान्यता मिळाली आहे, असे अलीकडेच फोनपे (PhonePe) कंपनीने म्हटले होते. तसेच, कंपनी आता आपल्या 30 कोटीहून अधिक युजर्संना विमा संबंधित सल्ला देऊ शकते, असे म्हटले होते. दरम्यान, आयआरडीएने फोनपे कंपनीला विमा ब्रोकिंग परवाना दिला आहे. आता फोनपे भारतातील सर्व विमा कंपन्यांची विमा उत्पादने विकू शकते.

टॅग्स :तंत्रज्ञानव्यवसायऑनलाइन