Join us

नववर्षात विमानात मिळेल फोनसेवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2018 04:13 IST

केंद्र नूतन वर्षात विमानात म्हणजेच इन-फ्लाइट फोनची सुविधा देऊ शकेल.

नवी दिल्ली : केंद्र नूतन वर्षात विमानात म्हणजेच इन-फ्लाइट फोनची सुविधा देऊ शकेल. कोणतीही दूरसंचार कंपनी सगळ्या देशात ही सेवा देऊ शकेल. दूरसंचार सचिव अरुणा सुंदरराजन म्हणाल्या की, या सेवेसाठी दूरसंचार परवान्यात नवा वर्ग निर्माण केला जाईल. या सेवेत किती आॅपरेटर असतील, हे सध्या निश्चित केलेले नाही. कॉलचा दर काय असेल व त्यासाठी किती पल्स रेट ठेवला जाईल हे मुद्दे मंजुरीनंतरच निश्चित केले जातील.