दोन दिवसांपासून पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर असले तरी सध्या पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडत चालले आहे. देशात अनेक ठिकाणी पेट्रोलच्या दरानं शंभरी गाठली आहे. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरावरून लोकांमध्येही रोष निर्माण झाला आहे. तर दुसरीकडे विरोधकही या वाढत्या किंमतीचा विरोध करत आहेत. अशा परिस्थितीत आता सरकारदेखील बॅकफुटवर जाताना दिसत आहे. पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे."आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचं उत्पादन कमी करण्यात आलं आहे. पुरवठा करणाऱ्या देशांकडून अधिक नफा कमावण्यासाठी उत्पादन कमी केलं जातं आहे. यामुळे ग्राहक देशांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे," असं धर्मेंद्र प्रधान म्हणाले. उत्पादक देशांकडून नफा कमावण्याचा प्रयत्न"आम्ही सातत्यानं ओपेक आणि ओपेक प्लस देशांकडे असे प्रकार होऊ नये याची मागणी करत आहोत. या परिस्थितीत बदल होईल, अशी आम्हाला अपेक्षा आहे," असंही ते म्हणाले. याव्यतिरिक्त कोरोनाची महासाथदेखील पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दराला कारणीभूत आहे. "आपल्याला अनेक विकासकामं करायची आहेत. यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार कर गोळा करतात. विकासकामांवर खर्च वाढवल्यामुळे रोजगार वाढणार आहेत. सरकारनं आपल्या गुतंवणूकीत वाढ केली आहे आणि या अर्थसंकल्पात ३४ टक्के अधिक रक्कम खर्त केली जाईल. राज्य सरकारच्या खर्चातही वाढ होणार आहे. हेच कारण आहे की आपल्याला कराची आवश्यकता आहे. तसंच संतुलन ठेवणंदेखील आवश्यक आहे. यावर अर्थमंत्री कोणताही मार्ग शोधू शकतात," असंही प्रधान यांनी स्पष्ट केलं.
Petrol Diesel Price Hike: का वाढतायत पेट्रोल-डिझेलचे दर?; पेट्रोलियम मंत्री म्हणतात...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2021 08:29 IST
Petrol Diesel Price Hike: देशात अनेक ठिकाणी पेट्रोलच्या दरानं गाठली शंभरी
Petrol Diesel Price Hike: का वाढतायत पेट्रोल-डिझेलचे दर?; पेट्रोलियम मंत्री म्हणतात...
ठळक मुद्देदेशात अनेक ठिकाणी पेट्रोलच्या दरानं गाठली शंभरीउत्पादक देशांकडून नफा कमावण्याचा प्रयत्न, प्रधान यांचं वक्तव्य