Join us
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोल जास्तीत जास्त 40 रुपये लिटरनेच विकायला हवं, भाजपा नेत्यानं सांगितलं गणित

By महेश गलांडे | Updated: December 8, 2020 09:23 IST

मुंबईमध्ये ६ डिसेंबरला पेट्रोलचे दर ९०.०५ रुपये तर डिझेलचे दर ८०.२३ रुपये प्रतिलिटर झाले आहेत. राज्यात परभणीमध्ये पेट्रोलचे दर सर्वाधिक ९२.१४ रुपये प्रतिलिटरवर पोहोचले आहेत.

ठळक मुद्देमुंबईमध्ये ६ डिसेंबरला पेट्रोलचे दर ९०.०५ रुपये तर डिझेलचे दर ८०.२३ रुपये प्रतिलिटर झाले आहेत. राज्यात परभणीमध्ये पेट्रोलचे दर सर्वाधिक ९२.१४ रुपये प्रतिलिटरवर पोहोचले आहेत.

नवी दिल्ली - पेट्रोल आणि डिझेलचे दर दोन वर्षांतील उच्चांकी पातळीवर पोहोचले आहेत. सोमवारीही तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर अनुक्रमे २८ आणि २९ पैसे प्रतिलिटर वाढविले आहेत. त्यामुळे अनेक शहरांमध्ये पेट्रोलचे दर पुन्हा एकदा नव्वदी पार गेले आहेत. पेट्रोलचे दर 90 पार केल्यानंतर देशातील सर्वसामान्य नागरिकांकडून रोष व्यक्त करण्यात येत आहे. तर, भाजपा नेते आणि राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामींनी पेट्रोलचे दर 40 रुपये प्रति लिटर असायला हवेत, असे स्पष्ट गणितच मांडलं आहे.  

मुंबईमध्ये ६ डिसेंबरला पेट्रोलचे दर ९०.०५ रुपये तर डिझेलचे दर ८०.२३ रुपये प्रतिलिटर झाले आहेत. राज्यात परभणीमध्ये पेट्रोलचे दर सर्वाधिक ९२.१४ रुपये प्रतिलिटरवर पोहोचले आहेत. पोर्ट ब्लेअरला एक लिटर पेट्रोलसाठी सर्वात कमी ७०.२३ रुपये एवढे दर आहेत. त्यामुळे, सर्वसामान्यांना इंधन दरवाढीतून सरकारने दिलासा द्यावा, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. तर, दुसरीकडे भाजपा नेते सुब्रमण्यम स्वामींनीही पेट्रोलचे दर 40 रुपये प्रति लिटर पेक्षा जास्त नसावेत असे गणित मांडलं आहे. 

सुब्रमण्यम स्वामी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन यासंदर्भात माहिती दिली, पेट्रोलचे दर देशात 90 रुपये प्रति लिटर झाले असून ती देशातील सर्वसामान्य नागरिकांची मोठी पिळवणूक असल्याचं स्वामींनी म्हटलंय. पेट्रोलच एक्स रिफायनरी मूळ किंमत 30 रुपये प्रति लिटर एवढी आहे. मात्र, सर्व प्रकारचे टॅक्स आणि पेट्रोल पंपाचे कमिशन मिळून ही किंमत 60 रुपयांनी वाढते. त्यामुळे, पेट्रोलचे प्रति लिटर दर 90 रुपये एवढे आहेत. माझ्या मते पेट्रोलच जास्तीत जास्त किंमत 40 रुपये प्रति लिटर असणे आवश्यक आहे, असेही स्वामींनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन म्हटलं आहे.  

दरम्यान, लॉकडाऊनच्या कालावधीत सरकारने पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर ठेवले होते. त्यानंतर १ जूनपासून दरवाढीस सुरूवात केली होती. सरकारने २२ सप्टेंबरपासून पुन्हा दरवाढीला ब्रेक लावला होता. २० नोव्हेंबरला पुन्हा दरवाढ केली होती. गेल्या १७ दिवसांमध्ये पेट्रोलचे दर २.३५ रुपयांनी तर डिझेलचे दर ३.१५ रुपयांनी वाढले आहेत. 

उत्पादन शुल्कात मोठी वाढकेंद्र सरकारकडून सध्या पेट्रोलवर ३२.९८ रुपये तर डिझेलवर ३१.८३ रुपये उत्पादन शुल्क आकारण्यात येते. तर महाराष्ट्र सरकारकडून पेट्रोल आणि डिझेलवर अनुक्रमे २६ आणि २४ टक्के व्हॅट आकारला जातो. त्यावर अनुक्रमे १०.२० रुपये आणि ३ रुपये सेसही घेण्यात येतो. 

टॅग्स :सुब्रहमण्यम स्वामीपेट्रोलडिझेलभाजपा