Join us
Daily Top 2Weekly Top 5

Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2026 15:06 IST

Petrol New Rates In US: इराणमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत प्रचंड वेगाने वाढ झाली आहे, ज्याचा थेट आणि मोठा फटका अमेरिकेतील सामान्य जनतेला सहन करावा लागत आहे.

Petrol New Rates In US: इराणमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत प्रचंड वेगाने वाढ झाली आहे, ज्याचा थेट आणि मोठा फटका अमेरिकेतील सामान्य जनतेला सहन करावा लागत आहे. अमेरिका हा जगातील कच्च्या तेलाचा सर्वात मोठा उत्पादक देश असूनही, तेथील कच्च्या तेलाचा भाव आज ११५ डॉलर प्रति बॅरल या उच्चांकी पातळीवर पोहोचलाय. 

या दरवाढीमुळे देशातील पेट्रोलची सरासरी किंमत ४.१० डॉलर प्रति गॅलन इतकी झाली आहे, जी जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ मानली जात आहे. विशेष म्हणजे जानेवारी महिन्यापासून आतापर्यंत पेट्रोलच्या किमतीत १.३ डॉलरची वाढ नोंदवण्यात आली असून ही प्रक्रिया अद्याप थांबलेली नाही.

सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती

ग्राहकांवर पडलेला अतिरिक्त आर्थिक बोजा

अमेरिका आणि इस्रायलने २८ फेब्रुवारी रोजी इराणवर केलेल्या हल्ल्यापासून अमेरिकेतील इंधन बाजारपेठेत अस्थिरता निर्माण झाली. या काळामध्ये अमेरिकेतील सामान्य नागरिकांनी इंधनासाठी एकूण ८.४ अब्ज डॉलर इतकी अतिरिक्त रक्कम खर्च केली आहे. दैनंदिन आकडेवारीनुसार, ही रक्कम दररोज २४० दशलक्ष डॉलर इतकी भरते. कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे महागाई वाढण्याची भीती निर्माण झाली असून, हीच परिस्थिती लक्षात घेऊन फेडरल रिझर्व्हनं आपल्या धोरणात्मक व्याजदरात कोणतीही कपात न करण्याचा निर्णय घेतलाय. आगामी काळात महागाईचा दर कशा प्रकारे बदलतो, यावरच पुढील आर्थिक निर्णय अवलंबून असतील असे फेडरल रिझर्व्हनं स्पष्ट केलंय.

विमान प्रवासाच्या भाड्यात मोठी वाढ

इंधन महागल्याचा सर्वात मोठा परिणाम विमान वाहतूक क्षेत्रावर झाला असून अमेरिकेतील विमान भाड्यामध्ये प्रचंड वाढ झाली आहे. प्रामुख्याने लांब पल्ल्याच्या आंतरराष्ट्रीय विमान प्रवासासाठी प्रवाशांना आता ३५ टक्क्यांपर्यंत अधिक पैसे मोजावे लागत आहेत. उदाहरण द्यायचं झाल्यास, सॅन फ्रान्सिस्को ते सिंगापूर या विमान प्रवासाचं भाडे आता १,१७९ डॉलरवर पोहोचलंय. तसेच लॉस एंजेलिस ते शांघाय या प्रवासासाठी प्रवाशांना १८ टक्के अधिक म्हणजेच ८१९ डॉलर खर्च करावे लागत आहेत. अटलांटिक पार करणाऱ्या विमान प्रवासाच्या भाड्यातही किमान २०० डॉलरची वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

केवळ आंतरराष्ट्रीयच नव्हे, तर अमेरिकेतील देशांतर्गत विमान प्रवासाचे दरही गगनाला भिडले आहेत. नेवार्क ते लॉस एंजेलिस यांसारख्या अंतर्गत मार्गावरील विमान भाडे आता पूर्वीच्या तुलनेत चौपट झालंय. युनायटेड एअरलाईन्स यांसारख्या मोठ्या विमान कंपन्यांनी इशारा दिलाय की, जर जेट फ्युएलच्या किमती अशाच चढे राहिल्या, तर त्यांना विमान भाड्यात २० टक्क्यांपर्यंत वाढ करणे अनिवार्य होईल. या वाढत्या प्रवास खर्चामुळे अनेक नागरिकांनी आपलं परदेश दौऱ्यांचं नियोजन रद्द करण्यास सुरुवात केली आहे. अधिकृत आकडेवारीनुसार, मार्च महिन्यात परदेशात जाणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत १६.९ टक्क्यांची मोठी घट झाली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : US Petrol Prices Surge: Trump's Decision Backfires on Americans.

Web Summary : Rising crude oil prices, fueled by global tensions, have significantly increased US petrol prices, hitting $4.10 per gallon, a high since June 2022. Airfares are soaring, impacting travel plans and causing a drop in international travel, further burdening American consumers.
टॅग्स :खनिज तेलडोनाल्ड ट्रम्पअमेरिकाअमेरिका-इस्रायल-इराण वॉर