नवी दिल्ली : सार्वजनिक क्षेत्रातील पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल पंप डिलर्सच्या कमिशनमध्ये ३० ऑक्टोबरपासून लागू झाली आहे. पेट्रोलच्या विक्रीवरील कमिशनमध्ये प्रतिलिटर ६५ पैसे तर डिझेलविक्रीवर प्रतिलिटर ४४ पैशांची वाढ केली आहे. कमिशनमध्ये वाढ केली तरी इंधनाच्या किरकोळ किमतीत कोणताही बदल होणार नाही. इंधनाच्या मालवाहतुकीत येणारा खर्च तर्कसंगत केल्याने ओडिशा, छत्तीसगड व हिमाचल प्रदेशमध्ये पेट्रोल-डिझेलच्या किमती ४.५ रुपयांपर्यंत कमी होणार आहेत.
काही राज्यांत पेट्रोल-डिझेल होणार स्वस्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2024 09:26 IST