Join us

Petrol-Diesel च्या किंमती कमी होणार की नाही? सरकारी इंधन कंपनीनं स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2024 13:08 IST

लोकसभा निवडणुकांपूर्वी पेट्रोल डिझेलच्या किंमती कमी होऊ शकतील का? यावर भारत पेट्रोलियमच्या अध्यक्षांनी प्रतिक्रिया दिली.

Petrol Diesel Price Cut Or Not: 'पेट्रोल आणि डिझेल १० रुपयांपर्यंत स्वस्त होऊ शकते', 'सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी सर्वसामान्यांना दिलासा', 'पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार, 'सरकारी तेल कंपन्या पेट्रोल-डिझेलचे दर कमी करण्याच्या विचारात आहेत'. अशा बातम्या अलीकडेच प्रसारमाध्यमांमध्ये येत होत्या. सरकारी ऑईल मार्केटिंग कंपनी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडचे (BPCL) अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक जी. कृष्णकुमार यांनी यावर स्पष्टीकरण दिलंय. इंधनाच्या किरकोळ किमतीत कपात केली जाणार असल्याचं हे वृत्त काल्पनिक आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.

आगामी लोकसभा निवडणुकीमुळे ओएमसीकडून किरकोळ इंधनाच्या किमती कमी करण्याच्या अपेक्षेवर त्यांनी जी. कृष्णकुमार यांनी स्पष्ट केलं. "आमच्या इंधन उत्पादनांच्या किरकोळ किंमती कमी झाल्याच्या बातम्या काल्पनिक आहेत. जागतिक परिस्थिती अस्थिर आहे. त्यामुळे, या प्रकरणाची संवेदनशीलता, किंमती कधी आणि बदलल्या जातील याबद्दल या टप्प्यावर भाष्य करणं कठीण आहे," असं त्यांनी स्पष्ट केलं.  

जी कृष्णकुमार म्हणाले की कंपनीनं डिसेंबर तिमाहीत एकत्रित निव्वळ नफ्यात ८२ टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडला (BPCL) सप्टेंबर २०२३ च्या तिमाहीत ८२४४ कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ नफा झाला होता. 

काय होतं वृत्त?

तीन ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी (OMCs) आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या पहिल्या सहामाहीत मोठा नफा कमावला आहे. आर्थिक वर्ष २०२२-२३ च्या तुलनेत ४९१७ टक्के वाढ झाली आहे. हा कल तिसऱ्या तिमाहीतही दिसून येऊ शकतो. यामुळे कंपन्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमती ५ ते १० रुपयांनी कमी करण्याचा विचार करू शकतात, असं वृत्त माध्यमांमध्ये प्रसिद्ध करण्यात आलं होतं.

टॅग्स :पेट्रोलडिझेल