Join us  

Petrol, Diesel Price Today: दोन दिवस थोडे-थोडे वाढविले; आज पेट्रोल, डिझेलची मोठी दरवाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2021 7:38 AM

Petrol Price 06 May 2021 Update: तेल वितरण कंपन्यांशी संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले की, मागील दोन महिन्यांत भारताचा कच्च्या तेलाचा खरेदी दर 7 टक्क्यांनी वाढून प्रतिबॅरल 4874.52 रुपये झाला आहे. जागतिक बाजारात कच्चा तेलाचे दर कमी झाले नाही, तर भारतात पेट्रोल-डिझेलचे दर वाढत राहतील. मागील काळातील तोटा दरवाढीच्या माध्यमातून भरून काढला जाईल.

Petrol, Diesel Price Today:  मे महिना उजाडताच उन्हाबरोबर महागाईचे चटकेदेखील बसायला सुरुवात झाली आहे. सरकारी तेल कंपन्यांनी सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोल, डिझेलच्या किंमतीमध्ये (Petrol-Diesel Price) वाढ केली आहे.  (petrol price hike by 52 paisa, diesel price hike by 30 paisa per liter in delhi.)

देशाच्या राजधानीमध्ये आज 6 मे 2021 रोजी पेट्रोलच्या दरात 52 पैसे आणि डिझेल 30 पैसे एवढी वाढ झाली आहे. यामुळे आज दिल्लीतील पेट्रोलचा दर हा 90.99 रुपये आणि डिझेलचा दर 81.42 रुपये प्रति लीटर झाला आहे. मुंबईमध्ये पेट्रोलची किंमत 97.34 रुपये आणि डिझेलची किंमत 88.49 रुपये प्रति लीटर झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून इंधनाच्या दरात वाढ होऊ लागली आहे. 4 मे रोजी पेट्रोलच्या किंमतीत 15 पैसे आणि डिझेलच्या किंमतीत 18 पैशांची वाढ झाली. यानंतर 5 मे रोजी पेट्रोलच्या किंमतीत 19 पैसे आणि डिझेलच्या किंमतीत 21 पैशांची वाढ झाली. ही वाढ 65 दिवसांनी झाली होती. या काळात 4 वेळा इंधनाचे दर कमी करण्यात आले होते. परंतू, निवडणुकांचा मौसम असल्याने कच्च्या तेलाचे दर वाढूनही किंमती वाढविण्यात आल्या नव्हत्या. 

तेल वितरण कंपन्यांशी संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले की, मागील दोन महिन्यांत भारताचा कच्च्या तेलाचा खरेदी दर 7 टक्क्यांनी वाढून प्रतिबॅरल 4874.52 रुपये झाला आहे. जागतिक बाजारात कच्चा तेलाचे दर कमी झाले नाही, तर भारतात पेट्रोल-डिझेलचे दर वाढत राहतील. मागील काळातील तोटा दरवाढीच्या माध्यमातून भरून काढला जाईल.

विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर 27 फेब्रुवारीपासून 66 दिवस पेट्रोल-डिझेलचे दर वाढविण्यात आले नव्हते. याआधीची शेवटची दरवाढ 15 एप्रिल रोजी झाली होती. या काळात डॉलरच्या तुलनेत रुपयाचा विनिमय दर घसरला. त्यामुळे सध्या कंपन्यांना इंधनांच्या विक्रीवर प्रतिलिटर सुमारे 3 रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. महिनाभरापूर्वी कच्च्या तेलाच्या खरेदीसाठी डॉलरच्या तुलनेत विनिमय दर 72.59 रुपये होता. तो आता 74.18 रुपये झाला आहे. त्यातच कच्च्या तेलाचे दर 8 डॉलरने वाढले आहेत. ब्रेंट क्रूडचे दर मंगळवारी 67.64 डॉलर प्रतिबॅरल होते. भारतात वापरल्या जाणाऱ्या खनिज तेलापैकी 80 टक्के तेल आयात केले जाते. 

याआधीची दरवाढ 15 एप्रिल रोजी झाली होती. या काळात डॉलरच्या तुलनेत रुपयाचा विनिमय दर घसरला. त्यामुळे सध्या कंपन्यांना इंधनांच्या विक्रीवर प्रतिलिटर सुमारे 3 रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. त्यातच कच्च्या तेलाचे दर 8 डॉलरने वाढले आहेत. त्यामुळे ही दरवाढ अपरिहार्यच होती.

टॅग्स :पेट्रोलइंधन दरवाढडिझेल