Join us  

Petrol-Diesel Price Today : पेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा वाढ; जाणून घ्या, आजचे दर...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2021 8:15 AM

Petrol-Diesel Price Today : रविवारी आणि सोमवारी किंमती थोड्या स्थिरावल्या असल्यामुळे ग्राहकांना दिलासा होता. मात्र, आज पुन्हा इंधन दरवाढ झाल्याचे पाहायला मिळाले.

ठळक मुद्देराजधानी दिल्लीत आज पेट्रोल आणि डिझेलमध्ये प्रति लिटर 35 पैशांनी वाढ झाली आहे.

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून इंधन दरात सातत्याने वाढ होताना दिसून येत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये होणारी ही वाढ पाहता देशातील अनेक शहरांत शंभरी गाठली आहे. गेल्या आठवड्यात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती अनेक पटींनी वाढल्या. दररोज 30 पैशांची वाढ झाली.  

रविवारी आणि सोमवारी किंमती थोड्या स्थिरावल्या असल्यामुळे ग्राहकांना दिलासा होता. मात्र, आज पुन्हा इंधन दरवाढ झाल्याचे पाहायला मिळाले. राजधानी दिल्लीत आज पेट्रोल आणि डिझेलमध्ये प्रति लिटर 35 पैशांनी वाढ झाली आहे. (petrol, diesel price hike 35 paisa today) 

दरम्यान, तेल कंपन्यांकडून दररोज पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जारी केले जातात. त्यानुसार गेल्या 12 दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. राजस्थानमधील श्रीगंगानगर, हनुमागड ते मध्यप्रदेशातील अनेक शहरांमध्ये किरकोळ पेट्रोलचे दर प्रति लिटर 100 रुपयांच्यावर गेले आहेत. 

मंगळवारी दिल्लीत पेट्रोलची किंमत 90.93 वर पोहोचली आहे. मुंबईतील पेट्रोलची किंमत प्रतिलिटर 97.34 रुपये आहे. एकंदरीतच मेट्रो शहरांमध्ये इंधनाचे दर सर्वाधिक आहे. दिल्ली आणि मुंबईमध्ये पेट्रोलची किंमत आतापर्यंतच्या उच्चांकी पातळीवर गेली आहे.

इंडियन ऑईलच्या वेबसाइटनुसार, मंगळवारी कोलकातामध्ये पेट्रोलचे दर 91.12 रुपये प्रति लिटर आहेत. तर डिझेलची 84.24 रुपये प्रति लिटर दराने विक्री केली जात आहे. मुंबईत डिझेलचे दर 88.44 रुपये प्रति लिटर आहे.

प्रमुख शहरांमधील पेट्रोलचे दरनवी दिल्ली (Delhi Petrol Price Today) : 90.93 रुपये प्रति लिटरमुंबई (Mumbai Petrol Price Today) : 97.34 रुपये प्रति लिटरकोलकाता (Kolkata Petrol Price Today) : 91.1 2रुपये प्रति लिटरचेन्नई (Chennai Petrol Price Today) : 92. 90 रुपये प्रति लिटरनोएडा (Noida Petrol Price Today) : 89.19 रुपये प्रति लिटर

प्रमुख शहरांमधील डिझेलचे दरनवी दिल्ली (Delhi Diesel Price Today) : 81.32 रुपये प्रति लिटरमुंबई (Mumbai Diesel Price Today) : 88.44 रुपये प्रति लिटरकोलकाता (Kolkata Diesel Price Today) : 84.20 रुपये प्रति लिटरचेन्नई (Chennai Diesel Price Today) : 86.31 रुपये प्रति लिटरनोएडा (Noida Diesel Price Today) : 81.76 रुपये प्रति लिटर

अशाप्रकारे जाणून घ्या, पेट्रोल-डिझेलचे नवे दर....देशातील HPCL, BPCL आणि IOC या तीन तेल विपणन कंपन्या सकाळी 6 नंतर पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जारी करतात. तसेच, पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दरांसाठी आपण वेबसाइटला भेट देऊन माहिती मिळवू शकता. याशिवाय, पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर तुम्ही मोबाइल फोनवर SMS द्वारे तपासू शकता. यासाठी तुम्ही 92249 92249 वर SMS पाठवून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल माहिती जाणून घेऊ शकता. तुम्हाला RSP<स्पेस> पेट्रोल पंप डीलरचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. 

टॅग्स :पेट्रोलडिझेलभारत