Petrol Diesel Price Today: इस्रायल-अमेरिका आणि इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे संपूर्ण मध्य पूर्वेतील परिस्थिती अत्यंत बिकट आहे. याचा परिणाम जगभरातील बाजारपेठांवर दिसून येतोय. जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती वेगाने वाढत आहेत. गेल्या चार दिवसांत कच्च्या तेलाचे दर ६० डॉलर प्रति बॅरलवरून थेट ७५ डॉलर प्रति बॅरलच्या आसपास पोहोचल्यात. म्हणजेच केवळ चार दिवसांत क्रूडच्या किमतीत सुमारे २५ टक्क्यांची मोठी वाढ झाली आहे.
जर हे युद्ध लवकर संपलं नाही, तर कच्च्या तेलाच्या किमतीत आणखी वाढ होईल, असं मानलं जात आहे. यामुळे जगभरात पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढतील. दरम्यान, आज म्हणजेच बुधवार ४ मार्च रोजी देखील क्रूडच्या किमतीत वाढ दिसून येत आहे. सध्या डब्लूटीआय (WTI) क्रूडचा भाव ०.२३ डॉलर किंवा ०.३१ टक्क्यांच्या वाढीसह ७४.७९ डॉलर प्रति बॅरलवर पोहोचला आहे. तर ब्रेंट क्रूडचा भाव ०.४५ डॉलर किंवा ०.५८ टक्क्यांच्या तेजीसह ८१.८७ डॉलर प्रति बॅरल झालाय.
तेल कंपन्यांनी जाहीर केले इंधनाचे दर
दुसरीकडे, देशातील इंधन कंपन्यांनीही पेट्रोल आणि डिझेलच्या ताज्या किमती जाहीर केल्या आहेत. आज देशभरात पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणताही विशेष बदल झालेला नाही. भारतात इंधनाचे दर ठरवण्याचा अधिकार इंधन कंपन्यांकडे आहे. या कंपन्या दररोज जागतिक बाजारातील क्रूडच्या किमती आणि डॉलर-रुपयाचा विनिमय दर यानुसार तेलाचे दर निश्चित करतात. यामध्ये व्हॅट (VAT), सेस आणि डीलर कमिशनचाही समावेश असतो, ज्यामुळे पेट्रोल-डिझेलचे दर त्यांच्या मूळ किमतीपेक्षा खूप जास्त होतात.
| शहर | पेट्रोल (प्रति लिटर) | डिझेल (प्रति लिटर) |
| दिल्ली | ९४.७७ | ८७.६७ |
| मुंबई | १०३.५४ | ९०.०३ |
| कोलकाता | १०५.४१ | ९२.०२ |
| चेन्नई | १००.८० | ९२.३९ |
Web Summary : War in Middle East fuels crude oil price hike, jumping from $60 to $75 per barrel in days. Petrol-diesel prices remain steady today in India, influenced by global crude rates and currency exchange. Fuel rates include VAT, cess, and dealer commission.
Web Summary : मध्य पूर्व में युद्ध से कच्चे तेल की कीमतों में उछाल, कुछ दिनों में 60 डॉलर से 75 डॉलर प्रति बैरल तक पहुंच गया। भारत में आज पेट्रोल-डीजल की कीमतें स्थिर हैं, जो वैश्विक कच्चे तेल की दरों और मुद्रा विनिमय से प्रभावित हैं। ईंधन दरों में वैट, उपकर और डीलर कमीशन शामिल हैं।