Join us

१५ दिवसांत पेट्रोल-डिझेल तब्बल सात वेळा महागले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2018 06:20 IST

महिन्याभरात प्रतिलीटर १.४० रुपयांची वाढ

मुंबई : पेट्रोल व डिझेलच्या दरात मंगळवारी सलग तिसऱ्या दिवशी अनुक्रमे २१ व १४ पैसे इतकी वाढ झाली. मागील १५ दिवसांतील ही सातवी दरवाढ आहे. यामुळे मुंबईसह राज्यात डिझेल ७४ तर पेट्रोल ८६ रुपये प्रति लिटरच्या पुढे गेले आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेल सातत्याने वाढत आहे. रुपयाही डॉलरसमोर कमकुवत झाला आहे. परिणामी इंधन महाग होत आहे. २२ जुलैपासून इंधन दरात सतत वाढ सुरू आहे. महिनाभरात पेट्रोल व डिझेलच्या दरात १.४० रुपये प्रति लिटरची वाढ झाली आहे. आता डिझेल ७४ रुपयांवर गेल्याने मालवाहतूकदार भाडेवाढ करण्याच्या विचारात असल्याचे महाराष्टÑ टेम्पो असोसिएशनचे उपाध्यक्ष दिनेश फडके यांनी ‘लोकमत’ ला सांगितले.मंगळवारचे दरशहर पेट्रोल +/-मुंबई ८५.४७ १४ पैसेनागपूर ८५.६६ १४ पैसेपुणे ८५.५२ १३ पैसेऔरंगाबाद ८६.०० १७ पैसेशहर डिझेल +/-मुंबई ७४.०० २१ पैसेनागपूर ७३.३८ २१ पैसेपुणे ७२.८८ २१ पैसेऔरंगाबाद ७३.३६ २१ पैसे

टॅग्स :पेट्रोलमुंबईपेट्रोल पंप