आंतरराष्ट्रीय बाजारात (International Market) कच्च्या तेलाच्या किंमतीत (Crude Oil) वाढ झाल्याने पेट्रोल आणि डिझेलचे दर दिवसागणिक वाढतच जात आहेत. आज सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेलचे दर वाढले आहेत. आज पेट्रोलच्या दरात २४ ते २५ पैशांची वाढ झाली आहे. तर डिझेलचे दर ३० ते ३१ पैशांनी वाढले आहेत. मुंबईमध्ये तर पेट्रोलच्या दराने नवा उच्चांक गाठला आहे. (Petrol Price Today 11 February 2021 In India)
देशाची राजधानी दिल्लीमध्ये गुरुवारी पेट्रोल ८७.८५ रुपये प्रतिलीटर, तर मुंबईत पेट्रोल प्रतिलीटर ९४.३६ रुपयांवर पोहोचले आहेत. अशीच परिस्थिती येत्या काळतही राहीली तर मुंबईत पेट्रोल लवकरच शंभरी गाठेल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. दिल्लीमध्ये डिझेलची किंमत प्रतिलीटर ७८.०३ रुपये इतकी झालीय. तर मुंबईत डिझेल प्रतिलीटर ८४.९४ रुपये इतकं महाग झालं आहे.
राज्यातील प्रमुख शहरांमधील पेट्रोल आणि डिझेलचे दरमुंबईत पेट्रोलचा दर (Mumbai Petrol Price Today) प्रतिलीटर ९४.३६ रुपये इतका आहे. तर नाशिकमध्ये (Nashik Petrol Price Today) ९३.६५ रुपये मोजावे लागणार आहेत. पुण्यात पेट्रोलचा आजचा दर (Pune Petrol Price Today) ९३.५४ रुपये इतका झाला आहे. तर नागपुरात पेट्रोल (Nagpur Petrol Price Today) ९४.३३ रुपयांवर पोहोचलं आहे.
Explainer : नाकापेक्षा मोती जड! २५ रुपयांचं पेट्रोल मिळतंय १०० रुपयांना; असं कसं? जाणून घ्या...
डिझेलच्या बाबतीत मुंबईत डिझेल प्रतिलीटर (Mumbai Diesel Price Today) ८४.९४ रुपयांना मिळतंय. तर पुण्यात डिझेलचा दर (Pune Diesel Price Today) ८२.८१ रुपये इतका झाला आहे. नाशिकमध्ये हाच दर (Nashik Diesel Price Today) ८२.९२ रुपये इतका आहे. नागपुरात डिझेल प्रतिलीटर (Nagpur Diesel Price Today) ८४.९१ रुपये इतके आहे.
कसे ठरतात पेट्रोल, डिझेलचे दर?आंतरराष्ट्रीय बाजारातील खनिज तेलाच्या किमती, हे तेल भारतात आणण्यासाठी करण्यात येणारा खर्च, रुपयाच्या तुलनेतील डॉलरचा दर यानुसार इंधनाचा दर निश्चित होतो. यानंतर पेट्रोल, डिझेलचा दर २५ ते ३० रुपये प्रति लिटरपर्यंत जातो. पण त्यानंतर केंद्र सरकार, राज्य सरकारं त्यावर विविध कर लावतात. त्यामुळे पेट्रोल, डिझेलची किंमत वाढत जाते. पेट्रोल, डिझेलची सध्याची किंमत पाहिली, तर त्यात करांचं प्रमाण तब्बल ६५ ते ७० टक्के इतकं आहे.
कसे ठरतात पेट्रोल, डिझेलचे दर?आंतरराष्ट्रीय बाजारातील खनिज तेलाच्या किमती, हे तेल भारतात आणण्यासाठी करण्यात येणारा खर्च, रुपयाच्या तुलनेतील डॉलरचा दर यानुसार इंधनाचा दर निश्चित होतो. यानंतर पेट्रोल, डिझेलचा दर २५ ते ३० रुपये प्रति लिटरपर्यंत जातो. पण त्यानंतर केंद्र सरकार, राज्य सरकारं त्यावर विविध कर लावतात. त्यामुळे पेट्रोल, डिझेलची किंमत वाढत जाते.