Join us

तुमच्या 'या' ५ चुकांमुळे सिबिल स्कोअर होतो खराब; या टीप्स फॉलो करा अन्यथा भविष्यात कर्ज घेणे विसरुन जा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2025 11:40 IST

Cibil Score : आजच्या काळात सिबिल स्कोअरला खूप महत्त्व आलं आहे. तुमचा स्कोअर खराब असेल तर कोणतीही बँक तुम्हाला कर्ज देणार नाही.

Cibil Score : सध्याच्या काळात तुमच्या सोशल स्टेटसपेक्षाही सिबिल स्कोअरचं स्टेटस फार महत्त्वाचं झालं आहे. हे सांगायचं कारण, म्हणजे काही दिवसांपूर्वी विवाहापूर्वी आता मुलांचा सिबील स्कोअर तपासला जातो, अशी बातमी तुम्ही वाचली असेल. तुमचा सिबिल स्कोअर कमी असेल तर कुठलीही बँक किंवा वित्तीय संस्था तुम्हाला जवळही उभे करणार नाही, अशी परिस्थिती आहे. माणसाला कधी कर्ज लागेल काही सांगता येत नाही. अशा परिस्थितीत जर कर्ज घ्यायची वेळ आली तर तुमचा सिबिल स्कोअर उत्तम असणे आवश्यक आहे. अनेकदा आपल्या चुकांमुळेच सिबिल स्कोअरचे नुकसान होते. आज आम्ही अशी ५ कारणे सांगणार आहोत, ज्यामुळे तुमचा सिबिल स्कोअर कमी होऊ शकतो.

तुमची बिले आणि कर्जाचा हप्ता वेळेवर न भरणेसिबिल स्कोअर कमी होण्याचं मुख्य कारण म्हणजे कर्जाचा हप्ता किंवा क्रेडिट कार्ड सारखी बिले वेळेवर न भरणे. या थेट परिणाम तुमच्या CIBIL स्कोअरवर होतो. अशा परिस्थितीत तुमच्या कर्जाचे EMI आणि क्रेडिट कार्डचे बिल नेहमी वेळेवर भरा. अनेकदा आपण पैसे असूनही शेवटच्या दिवसाची वाट पाहतो असतो. लक्षात ठेवा, जर तुम्ही वेळेआधी बिल भरले तर तुमचा सिबिल स्कोअर वाढण्यास मदत होते.

क्रेडिट कार्डचा अयोग्य वापरक्रेडिट कार्ड आता सामान्य गोष्ट झाली आहे. पण, अजूनही अनेकांना त्याचा योग्य वापर कसा करावा हे माहिती नाही. तुम्ही क्रेडिट कार्ड वापरणारे असाल तर तुम्ही अनेक गोष्टी लक्षात ठेवाव्यात. तुमच्या क्रेडिट कार्डच्या मर्यादेपेक्षा जास्त खर्च करू नका. नेहमी क्रेडिट कार्ड मर्यादेच्या फक्त ३० टक्के खर्च करण्याचा प्रयत्न करा. क्रेडिटचा जास्त वापर केल्याने CIBIL स्कोअर खराब होऊ शकतो.

क्रेडिट कार्ड बंद करणेक्रेडिट कार्डसाठी वारंवार अर्ज केल्याने तुमचा CIBIL स्कोर खराब होऊ शकतो. दुसरीकडे, तुम्ही तुमचे क्रेडिट कार्ड बंद केल्यास, तुमचे क्रेडिट युटिलायझेशन रेशो वाढते आणि तुमचा CIBIL स्कोर कमी होतो.

कर्जासाठी वारंवार अर्ज करणेतुम्ही कर्जासाठी अर्ज करता तेव्हा बँक तुमचा सिबिल स्कोअर तपासते. अशा परिस्थितीत, वारंवार अर्ज केल्यामुळे तुमचा CIBIL स्कोर देखील कमी होऊ शकतो. त्यामुळे जिथे कर्ज मिळण्याची खात्री आहे, तिथेच अर्ज केला तर तुमचे कष्ट आणि पैसे दोन्ही वाचतील. शिवाय बोनस म्हणून सिबिल स्कोअर सुधारण्यास मदत होईल. 

टॅग्स :बँकिंग क्षेत्रबँक