Join us

Smartphones: लोक स्मार्टफोन घेईनात, जगभर विक्री घटली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2023 05:59 IST

Smartphones: गेल्या वर्षी जगभरात स्मार्टफोन विक्रीत घट झाली आहे. चीन आणि भारत या दोन सर्वांत मोठ्या मोबाइल मार्केटमध्ये हीच परिस्थिती राहिली आहे.

नवी दिल्ली : गेल्या वर्षी जगभरात स्मार्टफोन विक्रीत घट झाली आहे. चीन आणि भारत या दोन सर्वांत मोठ्या मोबाइल मार्केटमध्ये हीच परिस्थिती राहिली आहे.

काउंटर पॉइंट मार्केट रिसर्चच्या अहवालानुसार, २०२१ च्या तुलनेत २०२२ मध्ये भारतात स्मार्टफोनची विक्री नऊ टक्के कमी झाली आणि १५.२ कोटी स्मार्टफोन विकले गेले. ही घसरण प्रामुख्याने एन्ट्री लेव्हल आणि बजेट सेगमेंट फोन्समध्ये झाली आहे.मोबाइलची सर्वांत मोठी बाजारपेठ असलेल्या चीनमध्ये स्मार्टफोनच्या विक्रीत सलग पाचव्या वर्षी घट झाली आहे. गेल्या वर्षी स्मार्टफोनची विक्री १४ टक्क्यांनी घसरून दशकाच्या नीचांकी पातळीवर आली. सर्व प्रमुख ब्रँडच्या विक्रीत घट झाली. विक्रीत तीन टक्के घसरण होऊनही ॲपलने ओप्पोला मागे टाकून चीनमध्ये दुसरे स्थान पटकावले आहे.स्मार्टफोन विक्रीतील फाइव्ह जी फोनचा हिस्सा २०२१च्या तुलनेत २०२२ मध्ये ३२ टक्केपर्यंत वाढला आहे. यात सॅमसंग अव्वल  आहे.

टॅग्स :स्मार्टफोनमोबाइल