Join us

जनतेचा पैसा लुटणा-यांची गय केली जाणार नाही - पंतप्रधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 05:15 IST

जनतेच्या पैशाची लूट सरकार कदापि सहन करणार नाही. आर्थिक गैरव्यवहार करणाºयांवर कठोर कारवाई केली जाईल

नवी दिल्ली : जनतेच्या पैशाची लूट सरकार कदापि सहन करणार नाही. आर्थिक गैरव्यवहार करणाºयांवर कठोर कारवाई केली जाईल, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नीरव मोदी याने पंजाब नॅशनल बँकेत केलेल्या ११,४०० कोटींच्या घोटाळ््याबाबत आपले मौन सोडले आहे. नवी दिल्लीत आयोजित ग्लोबल बिझनेस समिटमध्ये ते बोलत होते.

हा घोटाळा उघडकीस आल्यानंतर पंतप्रधानांनी सर्व प्रमुख वित्तीय संस्था आणि नियामक यंत्रणांना झालेल्या प्रकाराची बारकाईने चौकशी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. वित्तीय संस्था, लेखा परिक्षक तसेच नियामकांनी त्यांची जबाबदारी चोखपणे पार पाडली पाहिजे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

मेहुल चोकसी बँक खाते साफ करून पळालानवी दिल्ली : पीएनबी घोटाळ््यातील आरोपी गीतांजली जेम्स कंपनीचा मालक मेहुल चोकसी हा बँक खात्यांमधील सर्व पैसे घेऊन देशाबाहेर पळून गेला आहे. त्याने खात्यांमध्ये फक्त २ कोटी रुपये शिल्लक ठेवल्याचे आढळून आल्याचे प्राप्तिकर खात्याने स्पष्ट केले. चोकसीने एक मेल लिहून कर्मचाºयांचा पगार देऊ शकत नाही असे म्हटले आहे.कोठारी पिता-पुत्रांना कोठडीरोटोमॅक कंपनीचा मालक विक्रम कोठारी व त्याचा मुलगा राहुल यांना शुक्रवारी न्यायालयाने एक दिवसाचा ट्रान्झिट रिमांड सुनावला. या पिता-पुत्रांना ३,६९५ कोटी रुपयांच्या कर्जाची परतफेड न केल्याप्रकरणी अटक झाली आहे.नीरव मोदीच्या ४४ कोटींच्या ठेवी, शेअर गोठविलेनीरव मोदी समूहाच्या ४४ कोटी रुपयांच्या बँक ठेवी आणि शेअर सक्तवसुली संचालनालयाने (र्ईडी) शुक्रवारी गोठविले. त्याने आयात केलेली महागडी घड्याळेही जप्त केली.

टॅग्स :पंजाब नॅशनल बँक घोटाळानरेंद्र मोदी