Join us

पेटीएम आता कर्मचाऱ्यांना देणार नारळ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2024 07:50 IST

अशात कंपनीचे बिझनेस विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष प्रवीण शर्मा यांनी राजीनामा दिल्याने उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. 

नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने लादलेल्या निर्बंधांनंतर पेटीएम पेमेंट बँकेच्या अडचणीत सातत्याने वाढत आहेत. अशात कंपनीचे बिझनेस विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष प्रवीण शर्मा यांनी राजीनामा दिल्याने उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. 

काही कर्मचाऱ्यांना कंपनी लवकरच कमी करणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. परंतु या सर्व चर्चा निराधार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. शेअर बाजार नियामक सेबीकडे सादर केलेल्या माहितीमध्ये कंपनीने म्हटले आहे की, कंपनीत सध्या वार्षिक मूल्यांकन प्रक्रिया सुरू आहे.

कर्मचाऱ्यांच्या क्षमतांच्या आधारे समायोजन, तसेच पुनर्रचना केली जात आहे. या कर्मचारी कपात समजणे हे सर्वस्वी चुकीचे आहे. कंपनी कोणत्याही प्रकारे कपात करणार नाही. 

टॅग्स :पे-टीएमव्यवसाय