Join us  

Paytm पेमेंट बँकेच्या सीईओंनी दिला राजीनामा, शेअर्स गडगडले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2024 6:15 AM

रिझर्व्ह बँकेने पेटीएम पेमेंट्स बँकेवर बंदी घातल्याने पेटीएम पेमेंट्स बँक आधीच संकटात सापडलेली होती

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : पेटीएम पेमेंट्स बँकेचे सीईओ सुरिंदर चावला यांनी राजीनामा दिल्यामुळे कंपनीच्या समभागांत मोठी घसरण पाहायला मिळाली आहे.मुंबई शेअर बाजार आणि राष्ट्रीय शेअर बाजार या दोन्ही ठिकाणी पेटीएमचे समभाग ४ टक्के घसरून ३८८ रुपयांवर आले. कंपनीचे बाजार भांडवल ४६३.८४ कोटींनी घसरले.

रिझर्व्ह बँकेने पेटीएम पेमेंट्स बँकेवर बंदी घातल्याने पेटीएम पेमेंट्स बँक आधीच संकटात सापडलेली होती. त्यातच चावला यांनी राजीनामा दिल्यामुळे पेटीएमवरील मळभ आणखी गडद झाले आहे, असे सूत्रांनी सांगितले. वन९७ कम्युनिकेशन्सने नियामक दस्तावेजात सांगितले की, सीईओ सुरिंदर चावला यांनी ८ एप्रिल रोजी राजीनामा दिला. त्यांना २६ जून २०२४ रोजी कार्यमुक्त केले जाईल.

टॅग्स :पे-टीएमव्यवसायशेअर बाजार