Join us  

खुशखबर! नवरात्रीत Paytm वरून गॅस बुकिंग केल्यास मिळेल 10,001 रुपयांचे सोने, जाणून घ्या ऑफर...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2021 6:38 PM

Paytm launches Navratri Gold Offer: 7 ते 16 ऑक्टोबर दरम्यान दररोज 5  युजर्संना पेटीएम अॅपवरून सिलिंडर बुक केल्यास 10,001 रुपयांचे सोने जिंकण्याची संधी मिळेल.

नवी दिल्ली : देशभरात सणासुदीचा हंगाम  (Festive season) सुरू झाला आहे. पण, यावेळी सणांची सुरूवात होण्यापूर्वी पुन्हा एकदा एलपीजी सिलिंडरच्या (LPG cylinder) किमती वाढल्या आहेत. यातच पेटीएमने (Paytm) एलपीजी सिलिंडर बुकिंगसाठी 'नवरात्री गोल्ड' (Navratri 2021) ऑफर लाँच केली आहे. 7 ते 16 ऑक्टोबर दरम्यान दररोज 5  युजर्संना पेटीएम अॅपवरून सिलिंडर बुक केल्यास 10,001 रुपयांचे सोने जिंकण्याची संधी मिळेल. दरम्यान, ही ऑफर सध्याच्या सिलिंडरच्या बुकिंगवर देखील लागू होईल, ज्यासाठी किंमतीचे पेमेंट करण्यात आले नाही. (paytm navratri gold offer book gas cylinder via paytm wallet and get 10k of gold)

अलीकडे, कंपनीने ग्राहकांचा सिलिंडर बुकिंगचा अनुभव शानदार बनवला आहे. कंपनीने नवीन फीचर्स जोडली आहेत, ज्यामुळे युजर्संना त्यांच्या गॅस सिलिंडरच्या डिलिव्हरीचा मागोवा घेण्याची संधी मिळेल. याशिवाय, ग्राहकांना पेटीएममधून गॅस सिलिंडर रिफिल करण्यासाठी ऑटोमेटेड इंटेलिजेंट रिमाइंडर देखील मिळत आहे.

प्रत्येक बुकिंगवर 1000 कॅशबॅक पॉइंटग्राहक पेटीएम अॅपवर 'बुक गॅस सिलिंडर' फीचर वापरून बुकिंग करू शकतात. या व्यतिरिक्त, सर्व युजर्संना प्रत्येक बुकिंगवर 1000 कॅशबॅक पॉइंट दिले जातील, जे टॉप ब्रँडच्या आकर्षक डील आणि गिफ्ट व्हाउचरमध्ये रिडीम केले जाऊ शकतात. ही नवरात्री गोल्ड ऑफर (gold offer) इंडेन, एचपी गॅस आणि भारत गॅस या तिन्ही प्रमुख एलपीजी कंपन्यांच्या सिलिंडरच्या बुकिंगवर लागू होईल.

कसे करायचे बुकिंग?पेटीएममधून गॅस सिलिंडर बुक करण्यासाठी युजर्संना 'बुक गॅस सिलिंडर' टॅबवर जावे लागेल. त्यांना त्यांचा गॅस पुरवठादारही निवडावा लागेल. यानंतर, त्यांना मोबाईल नंबर, एलपीजी आयडी आणि ग्राहक क्रमांक टाकावा लागेल. पेटीएम वॉलेट, पेटीएम यूपीआय, कार्ड्स, नेटबँकिंग किंवा पेटीएम पोस्टपेडसह गॅस सिलिंडर बुक करण्यासाठी ग्राहक त्यांच्या पसंतीचा पेमेंट मोड निवडू शकतात. यासह, ग्राहकांना त्यांचे गॅस सिलिंडर आत्ताच बुक करून पुढील महिन्यात देण्याचा पर्याय दिला जाईल. सिलिंडर युजर्सच्या नोंदणीकृत पत्त्यावर जवळच्या गॅस एजन्सीद्वारे पुरवले जातील.

कंपनीने काय म्हटले आहे?पेटीएमच्या प्रवक्त्याने सांगितले की, आम्हाला हा सण आमच्या युजर्ससोबत साजरा करायचा आहे. यासाठी आम्ही त्यांना एलपीजी सिलिंडर बुकिंगवर कॅशबॅक आणि बक्षिसे देत आहोत, जे आमच्या प्लॅटफॉर्मवरील सर्वात लोकप्रिय खर्चांपैकी एक आहे. दररोज 5 भाग्यवान युजर्संना Paytm वर 10,001 रुपयांचे सोने जिंकण्याची संधी मिळेल.

टॅग्स :पे-टीएमगॅस सिलेंडरनवरात्री