Join us

'अपनी तो जैसे-तैसे..' गाण्यावर Paytm च्या मालकाचा भन्नाट डान्स, कंपनीला मिळाली खुशखबर! पाहा Video

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2021 16:23 IST

हर्ष गोयंका यांनी Paytm चे संस्थापक विजय शेखर यांच्या बॉलीवूड गाण्यावर थिरकतानाचा एक भन्नाट व्हिडिओ ट्विट केला आहे. 

नवी दिल्ली-

उद्योगपती हर्ष गोयंका (Harsh Goenka) सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असतात. नवनवे व्हिडिओ ते आपल्या ट्विटर हँडलवरुन ट्विट करतात. त्याची सोशल मीडियातील प्रसिद्धी लक्षात घेता त्यांनी ट्विट केलेली गोष्ट लगेच व्हायरल देखील होते. आता हर्ष गोयंका यांनी Paytm चे संस्थापक विजय शेखर यांच्या बॉलीवूड गाण्यावर थिरकतानाचा एक भन्नाट व्हिडिओ ट्विट केला आहे. 

हर्ष गोयंका यांनी ट्विट केलेल्या व्हिडिओमध्ये Paytm कंपनीचे संस्थापक मालक विजय शेखर बॉलीवूडच्या 'अपनी तो जैसे-तैसे' या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. विजय शेखर यांच्यासोबत त्यांच्या कंपनीचे कर्मचारी देखील सेलिब्रेशन करत आहेत. "भारतातील सर्वात मोठ्या IPO पैकी SEBI कडून मंजुरी मिळाल्यानंतर Paytm च्या कार्यालयात अशाप्रकारे जल्लोष साजरा केला गेला", असं कॅप्शन हर्ष गोयंका यांनी ट्विटला दिलं आहे. 

देशातील आघाडीची डिजिटल पेमेंट कंपनी पेटीएमच्या आयपीओची गुंतवणूकदार आतुरतेने वाट पाहात आहेत. यातच गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या Paytm च्या IPO ला अखेर सेबीकडून मंजुरी देण्यात आली आहे. डिजिटल वित्तीय सेवा कंपनी Paytm ला बाजार नियामक सेबीकडून १६,६०० कोटी रुपयांच्या IPO ला मंजुरी मिळाली आहे. नोव्हेंबर महिन्याच्या मध्यावर Paytm आपला IPO शेअर मार्केटमध्ये सादर करेल, असे सांगितले जात आहे. Paytm आयपीओ यशस्वी झाला, तर तो आतापर्यंतचा देशातील सर्वांत मोठा IPO असेल. आतापर्यंत हा विक्रम कोल इंडियाच्या नावावर आहे. सन २०१० मध्ये IPO द्वारे १५ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली होती.

टॅग्स :पे-टीएमव्यवसाय