Join us

१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 09:45 IST

New GST Rates: पुढील आठवड्यापासून लागू होणाऱ्या नवीन जीएसटी दरांमुळे एअर कंडिशनर (एसी) उत्पादक कंपन्या आणि डीलर्सनं एसी बुकिंग सुरू केलं आहे.

New GST Rates: पुढील आठवड्यापासून लागू होणाऱ्या नवीन जीएसटी दरांमुळे एअर कंडिशनर (एसी) उत्पादक कंपन्या आणि डीलर्सनं एसी बुकिंग सुरू केलं आहे. किंमतीत कपात झाल्यानंतर ग्राहकांची मागणी वाढेल अशी कंपन्यांना आशा आहे. आपण ग्राहकांना १० टक्के जीएसटी कपातीचा पूर्ण फायदा देत आहोत आणि यामुळे ग्राहकांना वेगवेगळ्या मॉडेल्सवर ४,००० रुपयांपर्यंत बचत होण्यास मदत होईल, असं रूम एअर कंडिशनर उत्पादक कंपन्यांनी म्हटलंय. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या अध्यक्षतेखाली या महिन्यात झालेल्या जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत जीएसटी स्लॅब ४ वरून २ करण्याचा निर्णय घेण्यात आला. आता जीएसटी दर ५ आणि १८ टक्के असतील.

एसीवर २८ ऐवजी १८ टक्के जीएसटी

जीएसटी दरांच्या सुसूत्रीकरणाचा एक भाग म्हणून, टेलिव्हिजन आणि एअर कंडिशनरसारख्या ग्राहकोपयोगी वस्तूंवरील दर कमी करण्यात आले आहेत, तसंच अनेक अन्न आणि दैनंदिन वापराच्या वस्तूंवरही दर कमी करण्यात आले आहेत. एअर कंडिशनरवर सध्या २८ टक्के जीएसटी आकारला जातो. २२ सप्टेंबर रोजी, नवरात्रीच्या पहिल्या दिवशी, नवीन दर लागू झाल्यानंतर, त्यावर १८ टक्के जीएसटी आकारला जाईल. "ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आमचे डीलर्स बुकिंग घेत आहेत आणि २२ सप्टेंबर रोजी, नवीन जीएसटी दर लागू झाल्यावर बिल भरण्यास सुरुवात करतील," असं ब्लू स्टारचे व्यवस्थापकीय संचालक बी. थियागराजन यांनी आयएएनएसला सांगितलं.

इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी

१ रुपांत एसीचं बुकिंग

हायरनं १ रुपयाच्या टोकन रकमेसह एसी बुकिंग सुरू केलं आहे. या ऑफरमध्ये निवडक पेमेंट मोड्सवर १० टक्के पर्यंत कॅशबॅक, इन्व्हर्टर स्प्लिट एसीवर मोफत इंस्टॉलेशन, गॅस चार्जिंगसह ५ वर्षांची वॉरंटी आणि सोपे ईएमआय पर्याय समाविष्ट आहेत. कंपनीनं सांगितलं की एसीसाठी बुकिंग १० सप्टेंबर ते २१ सप्टेंबर २०२५ पर्यंत सुरू राहील, तर खरेदी २२ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर २०२५ दरम्यान करता येईल. हायरनं त्यांच्या १.६ टन ५-स्टार एसीची किंमत ३,९०५ रुपयांनी आणि १.० टन ३-स्टार एसीची किंमत २,५७७ रुपयांनी कमी केली आहे.

टॅग्स :व्यवसायजीएसटी