नवी दिल्ली - प्रवासी वाहनांच्या विक्रीत जुलै २०१८ मध्ये २.१० टक्क्यांची घट झाली. जुलै २०१७ मध्ये देशभरात २.९९ लाख प्रवासा वाहनांची विक्री झाली होती. ती यंदा २.९० लाखांवर आली. मंदीसदृश्य वातावरण असल्यामुळे विक्रीला फटका बसत आहे. आॅटोमोबाइल उत्पादकांच्या सोसायटी आॅफ इंडियन आॅटोमोबाइल मॅन्युफॅक्चरर्सने (सिआम) ही आकडेवारी जाहीर केली.सिआमनुसार, कार विक्रीतही मागीलवर्षीच्या जुलै महिन्याच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. गेल्या वर्षीच्या जुलै महिन्याच्या तुलनेत यंदा दीड लाख दुचाकी अधिक विकल्या गेल्या. यंदा १८.१७ लाख दुचाकींची विक्री झाली. हा आकडा जुलै २०१७ मध्ये १६.६९ लाख होता.चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या चार महिन्यांचा (एप्रिल-जुलै २०१८) विचार केल्यास, प्रवासी वाहनांची विक्री एप्रिल-जुलै २०१७ च्या तुलनेत १३.३२ टक्क्यांनी अधिक झाली. याच काळात व्यावसायिक वाहनांच्या विक्रीत ४५.४२ टक्के व तीन चाकींच्या विक्रीत ५१.८२ टक्के वाढ झाली. एप्रिल-जुलै २०१८ दरम्यान दुचाकी वाहनांची विक्री १३.९४ टक्क्यांनी अधिक झाली.एप्रिल ते जुलै २०१८ मध्ये प्रवासी वाहनांच्या निर्यातीत मागीलवर्षीपेक्षा ५.९० टक्के घट झाली. पण याच कालावधित तीन चाकी व दुचाकी वाहनांची निर्यात अनुक्रमे ३८.२३ व ६९.२० टक्क्यांनी वाढली.त्यामुळेच एकंदर वाहनांच्या निर्यातीत २६.५६ टक्क्यांची वाढ झाल्याचे दिसून येते.टाटाची विक्री घसरलीमंदीसदृश्य वातावरणाचा टाटा मोटर्ससारख्या कंपनीलाही फटका बसला. टाटाने जुलै २०१८ मध्ये जगभरात ९२ हजार ६३९ गाड्यांची विक्री केली. पण हा आकडा मागीलवर्षीच्या जुलैपेक्षा ५ टक्के कमी आहे.
कारची विक्री घटली, प्रवासी वाहनांच्या विक्रीत २.१० टक्क्यांची घट
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2018 04:48 IST