Join us  

Parle चा IBM सोबत करार; उत्पादनं वेळेत बाजारात पोहोचवण्यासाठी घेणार Artificial Intelligence ची मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2021 5:48 PM

पार्ले ही कंपनी आपल्या Parle G या बिस्कीटांसाठी आहे प्रसिद्ध. या करारानंतर वेळेत कंपनीला आपली उत्पादनं बाजारपेठेत पोहोचवण्यास मदत मिळणार आहे.

ठळक मुद्देपार्ले ही कंपनी आपल्या Parle G या बिस्कीटांसाठी आहे प्रसिद्ध.या करारानंतर वेळेत कंपनीला आपली उत्पादनं बाजारपेठेत पोहोचवण्यास मदत मिळणार आहे.

दैनंदिन खाद्यपदार्थ तयार करणारी कंपनी पार्ले प्रोडक्ट्स आणि आयडी क्षेत्रातील दिग्गज कंपनी आयबीएम यांनी गुरूवारी नव्या कराराची घोषणा केली. कराराचा एक भाग म्हणून, प्रामुख्यानं बिस्किटांसाठी प्रसिद्ध असलेल्या पार्ले या कंपनीला आपली उत्पादनं जलद आणि प्रभावीपणे बाजारात आणण्यासाठी आयबीएम तंत्रज्ञान सहाय्य पुरवेल. ही माहिती दोन्ही कंपन्यांनी जारी केलेल्या संयुक्त निवेदनात दिली आहे.पार्ले प्रॉडक्ट्स आघाडीची सुरक्षा आणि उद्योगातील तंत्रज्ञानासह आयबीएमच्या ट्रान्सफॉर्मेशनल मॉडर्न क्लाउड आणि आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) क्षमतेचा वापर करेल, असं या संयुक्त निवेदनात नमूद करण्यात आलं आहे. यात कंपनीला आयबीएमकडून सल्ला आणि त्यांच्या सेवांचा लाभही घेता येणार आहे. कंपनीला यामुळे आपल्या पार्ले बिस्कीटांसह अधिक विक्री होत असलेल्या उत्पादनांना बाजारात योग्य वेळेत आणि योग्य ठिकाणी पोहोचवण्यासाठी मदत मिळेल असंही निवेदनाद्वारे सांगण्यात आलं आहे. "भारतीय ग्राहकांची वाढती मागणी पूर्ण करण्याला आमचं प्राधान्य आहे. आम्ही देशातील सर्वात मोठा बिस्कीट ब्रँड प्रदान करतो. आयबीएम बरोबर काम करून आम्ही आमचे सुरक्षेचा परीघ अधिक बळकट करु आणि बाजारपेठेत पोहोचण्यासाठी लागणारी वेळ कमी करून आपलं कामकाज सुरळीत करू. ही आमच्यासाठी महत्त्वपूर्ण कामगिरी असेल," असं मत या करारानंतर पार्ले प्रोडक्ट्सचे कार्यकारी संचालक अजय चौहान यांनी व्यक्त केलं. 

टॅग्स :तंत्रज्ञानभारतअन्न