Join us
Daily Top 2Weekly Top 5

पॅन कार्ड बंद होणार? आयटी रिटर्न भरला का? ३१ डिसेंबरपूर्वी उरका 'ही' कामे; अन्यथा रिफंडला मुकाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 14:08 IST

December 31 Deadline : ३१ डिसेंबर हा तुमचा कर आणि आर्थिक बाबी पूर्ण करण्याची शेवटची संधी आहे. आज थोडीशी काळजी घेतल्यास नवीन वर्षात मोठ्या समस्यांपासून वाचू शकता.

December 31 Deadline : आज ३१ डिसेंबर! कॅलेंडरचे पान उलटण्यासोबतच अनेक आर्थिक नियमांची मुदतही आज संपत आहे. जर तुम्ही आज रात्री १२ वाजेपर्यंत काही महत्त्वाची कामे पूर्ण केली नाहीत, तर उद्यापासून (१ जानेवारी २०२६) तुम्हाला दंडाचा सामना करावा लागू शकतो किंवा तुमच्या बँकिंग सेवा खंडित होऊ शकतात. नवीन वर्षाचे स्वागत करण्यापूर्वी खालील कामांची यादी एकदा तपासून घ्या.

१. 'बिलेटेड' आणि 'रिवाईज्ड' आयटी रिटर्नज्या करदात्यांनी अद्याप आर्थिक वर्षाचा प्राप्तिकर परतावा भरलेला नाही, त्यांच्यासाठी आजचा दिवस शेवटची संधी आहे. आजनंतर तुम्हाला विलंबित किंवा सुधारित रिटर्न भरता येणार नाही. रिटर्न न भरल्यास तुमचा टॅक्स रिफंड कायमचा अडकू शकतो आणि तुम्हाला मोठा दंडही भरावा लागू शकतो.

२. पॅन-आधार लिंकिंग : कार्ड होणार निष्क्रिय?तुमचा 'पॅन' कार्ड आधारशी लिंक करण्याची आज अंतिम तारीख आहे. १ जानेवारीपासून लिंक न केलेले पॅन कार्ड 'इनऑपरेटिव्ह' म्हणजेच निष्क्रिय होऊ शकते. पॅन कार्ड बंद झाल्यास बँक खाते उघडणे, डीमॅट खाते हाताळणे आणि मोठ्या व्यवहारांत अडचणी येतील. तसेच, नंतर लिंक करण्यासाठी ५,००० ते १०,००० रुपयांपर्यंत दंड भरावा लागू शकतो.

३. गुंतवणूक आणि टॅक्स प्लॅनिंगअनेक करदाते वर्षाच्या शेवटी गुंतवणूक करतात. जर तुम्ही कलम ८०सी अंतर्गत ELSS, PPF, NPS किंवा आरोग्य विम्याचा हप्ता आज भरला नाही, तर त्याचा परिणाम तुमच्या Form 16 किंवा AIS वर होऊ शकतो. यामुळे तुम्हाला मिळणाऱ्या टॅक्स सवलतीवर पाणी सोडावे लागू शकते.

४. AIS आणि Form 26AS ची पडताळणीतुमच्या वार्षिक माहिती विवरणात किंवा Form 26AS मध्ये उत्पन्नाची चुकीची नोंद असल्यास ती दुरुस्त करण्यासाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. टीडीएस कापला गेला आहे की नाही, याची खात्री आजच करा, जेणेकरून भविष्यात प्राप्तिकर विभागाची नोटीस येणार नाही.

५. ७ व्या वेतन आयोगाच्या १० वर्षांचा टप्पा पूर्णसरकारी कर्मचाऱ्यांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक आहे, कारण ७ व्या वेतन आयोगाचा १० वर्षांचा कार्यकाळ आज संपत आहे. जरी १ जानेवारीपासून पगारात लगेच बदल होणार नसला, तरी आता ८ व्या वेतन आयोगाच्या हालचालींना वेग येईल. यामुळे भविष्यात पगार आणि पेन्शनमध्ये मोठ्या बदलांची चिन्हे आहेत.

वाचा - धातू बाजारात 'भूकंप'! चांदी १९ हजार रुपयांनी कोसळली, तर सोने १ हजाराने स्वस्त; किंमत अजून कमी होणार?

आजच पूर्ण करावयाची कामांची चेकलिस्ट

कामअंतिम तारीखपरिणाम (चूक झाल्यास)
आयटी रिटर्न३१ डिसेंबर २०२५दंड आणि रिफंडचे नुकसान
पॅन-आधार लिंक३१ डिसेंबर २०२५पॅन कार्ड निष्क्रिय होणे
बचत गुंतवणूक३१ डिसेंबर २०२५टॅक्स सवलत न मिळणे
TDS कंप्लायन्स३१ डिसेंबर २०२५व्याज आणि पेनल्टी

 

 

English
हिंदी सारांश
Web Title : Deadline looms: File ITR, link PAN-Aadhaar before December 31st!

Web Summary : Crucial December 31st deadline! File ITR, link PAN-Aadhaar to avoid penalties and inactive PAN. Complete tax planning, verify AIS/Form 26AS for compliance.
टॅग्स :इन्कम टॅक्सपॅन कार्डआधार कार्डबँकिंग क्षेत्र