Join us

तुमच्याकडेही अशा प्रकारचे PAN Card असल्यास 10,000 रुपयांचा दंड होऊ शकतो, जाणून घ्या नियम!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2022 15:23 IST

PAN-Aadhaar Card link : मुदतीपूर्वी तुम्ही तुमचा पॅन आधारशी लिंक (PAN-Aadhar card link) केले नाही, तर तुमचे पॅन कार्डही निष्क्रिय केले जाऊ शकते. 

नवी दिल्ली : तुमच्याकडेही पॅन कार्ड (Pan card) असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. पॅन कार्डधारकांना 31 मार्च 2022 पर्यंत त्यांचा कायमस्वरूपी खाते क्रमांक (PAN) आधार कार्ड क्रमांकाशी जोडण्याचा सल्ला देण्यात आला आहे. या मुदतीपूर्वी तुम्ही तुमचा पॅन आधारशी लिंक (PAN-Aadhar card link) केले नाही, तर तुमचे पॅन कार्डही निष्क्रिय केले जाऊ शकते. 

याचबरोबर, तुम्हाला आधारशी पॅन लिंक करण्यासाठी 1000 रुपये देखील द्यावे लागतील. तसेच, पॅन कार्डधारकांच्या अडचणी एवढ्यावरच संपणार नाहीत. कारण संबंधित व्यक्ती म्युच्युअल फंड, स्टॉक, बँक खाती उघडणे इत्यादींमध्ये गुंतवणूक करू शकणार नाही, ज्याठिकाणी पॅन कार्ड सादर करणे आवश्यक आहे.

'या' पॅनकार्डधारकांना 10,000 रुपये भरावे लागतीलयाशिवाय, जर संबंधित व्यक्तीने पॅन कार्ड तयार केले, जे आता वैध नाही. तर आयकर कायदा 1961 च्या कलम 272N अंतर्गत, मूल्यांकन अधिकारी संबंधित व्यक्तीला दंड म्हणून 10,000 रुपये भरण्याचे निर्देश देऊ शकतात.

अशा प्रकारे ऑनलाइन लिंक करू शकता...- सर्वप्रथम इन्कम टॅक्सच्या वेबसाइटवर जा.- आधार कार्डमध्ये दिल्याप्रमाणे नाव, पॅन क्रमांक आणि आधार क्रमांक टाका.- आधार कार्डमध्ये फक्त जन्माचे वर्ष दिले असल्यास चौकोनावर टिक करा.- आता कॅप्चा कोड टाका.- आता लिंक आधार बटणावर क्लिक करा.- तुमचा पॅन आधारशी लिंक केला जाईल.

एसएमएसद्वारे सुद्धा लिंक करू शकतातुम्हाला तुमच्या फोनवर UIDPAN टाइप करावे लागेल. यानंतर 12 अंकी आधार क्रमांक टाका. त्यानंतर 10 अंकी पॅन क्रमांक टाका. आता स्टेप 1 मध्ये सांगितलेला मेसेज 567678 किंवा 56161 वर पाठवा.

निष्क्रिय पॅन कसे सक्रिय करावे?निष्क्रिय पॅन कार्ड सक्रिय केले जाऊ शकते. यासाठी तुम्हाला एसएमएस पाठवावा लागेल. तुम्हाला मेसेज बॉक्समध्ये जावे लागेल आणि तुमच्या रजिस्टर मोबाईलवरून 10 अंकी पॅन क्रमांक टाकल्यानंतर स्पेस देऊन 12 अंकी आधार क्रमांक टाका आणि 567678 किंवा 56161 वर एसएमएस करा. 

टॅग्स :पॅन कार्डआधार कार्ड