Join us

Pakistan: पाकिस्तानमध्ये पेट्राेल २८२ रुपये लीटर, तरीही भारतापेक्षा स्वस्त, विनिमय दराचा परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2023 06:21 IST

Petrol Price In Pakistan: आर्थिक संकटात सापडलेल्या पाकिस्तानात पेट्राेलचा दर १० रुपयांनी वाढविण्यात आला आहे. तेथील चलनानुसार पेट्राेलचा दर २८२ रुपये प्रतिलिटर आहे.

नवी दिल्ली : आर्थिक संकटात सापडलेल्या पाकिस्तानात पेट्राेलचा दर १० रुपयांनी वाढविण्यात आला आहे. तेथील चलनानुसार पेट्राेलचा दर २८२ रुपये प्रतिलिटर आहे. मात्र, विनिमय दरानुसार भारताच्या तुलनेत पाकिस्तानात पेट्राेल स्वस्त आहे. भारतीय चलनानुसार, पाकिस्तानात पेट्राेलचा दर ८१.७० रुपये प्रतिलिटर आहे. तर भारतात सरासरी १०४ रुपये प्रतिलिटर एवढा दर आहे. 

सर्वात स्वस्त पेट्राेल कुठे?जगात सर्वात स्वस्त पेट्राेल व्हेनेझुएला येथे आहे. तर हाँगकाँग, सीरिया आणि आइसलँड येथे सर्वात महाग पेट्राेल आहे. जगभरात सरासरी १०८.७६ रुपये प्रतिलिटर असा पेट्राेलचा दर आहे.

इतर देशांतील पेट्राेलचे दर (भारतीय चलनानुसार)अमेरिका    ८४.०६रशिया    ५१.५७ब्रिटन    १४८.५८व्हेनेझुएला    १.३०लीबिया    २.५७इराण    ४.३८हाँगकाँग    २४२.९४सीरिया    १९२.४६आइसलँड    १९२.३०

टॅग्स :पेट्रोलपाकिस्तान