Join us  

कंपनी असावी तर अशी; 5-10 रुपये नाही, तर देणार 240 रुपयांचा डिव्हिडेंड; पाहा डिटेल्स...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2024 2:56 PM

Dividend Stock News: लाभांशाची रक्कम 7 मे रोजी शेअरधारकांच्या खात्यात जमा होईल.

Oracle Dividend 2024 :शेअर बाजारातीलगुंतवणूक जोखमीची असते, पण कधी-कधी असा शेअर हाती लागतो, जो बंपर नफा देतो. आज आम्ही तुम्हाला अशा एका शेअरबद्दल सांगणार आहोत, जो आपल्या शेअरधारकांना 5-10 नव्हे, तर तब्बल 240 रुपये प्रति शेअर डिव्हिडेंड (Dividend 2024) देणार आहे. तुमच्याकडे ओरॅकल फायनान्शिअल सर्व्हिसेसचे शेअर्स (Oracle Financial Services Share Price) असतील, तर तुम्हाला कंपनीकडून हा डिव्हिडेंड मिळणार आहे. 

बुधवारी सांयकाळी अनेक कंपन्यांनी आपल्या शेअरधारकांना मोठा लाभांश जाहीर केला आहे. यात ओरॅकल कंपनीचेही नाव आहे. कंपनीने सांगितले की, लाभांशाची रक्कम 7 मे रोजी भागधारकांच्या खात्यात जमा होईल.

2014 मध्ये 485 रुपये लाभांश दिला 7 मे पर्यंत शेअर्स होल्ड करणाऱ्या शेअरधारकांनाच कंपनीकडून लाभांश मिळेल. जर तुमच्याकडे कंपनीचा स्टॉक नसेल, तर तुम्ही आता तो खरेदी करू शकता. कंपनी भागधारकांना लाभांशाच्या रुपात मोठी रक्कम देणार आहे. विशेष म्हणजे, 2014 मध्ये देखील कंपनीने भागधारकांना प्रति शेअर 485 रुपये लाभांश दिला होता.

कंपनी 10 वर्षांपासून लाभांश देत आहेकंपनी त्यांच्या शेअरधारकांना मागील 10 वर्षांपासून लाभांश देत आहे. 2014 मध्ये कंपनीने गुंतवणूकदारांना 485 रुपये, 2015 मध्ये 180 रुपये, 2016 मध्ये 100 रुपये, 2017 मध्ये 170 रुपये, 2018 मध्ये 130 रुपये, 2020 मध्ये 180 रुपये, 2021 मध्ये 200 रुपये, 2022 मध्ये 190 रुपये, 20236 मध्ये 225 आणि आता 2024 मध्ये प्रति शेअर 240 रुपये लाभांश देणार आहे.

जाणून घ्या कंपनीचा नफा ?कंपनीने चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. या तिमाहीत कंपनीचा नफा 479.3 कोटी रुपयांवरून 560 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. याशिवाय कंपनीचे उत्पन्नही 1,470.5 कोटी रुपयांवरून 1,642.4 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. तसेच, कंपनीची ऑपरेटिंग इनकम 2,680 कोटी रुपये आहे.

आज शेअर्सची दमदार सुरुवात गुरुवारी कंपनीच्या शेअरची सुरुवात 1.71 टक्क्यांच्या वाढीसह झाली. कंपनीचा शेअर 7,485.00 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. गेल्या 6 महिन्यांचा चार्ट पाहिला. तर या शेअरने गुंतवणूकदारांना 89.04 टक्के परतावा दिला आहे. 25 ऑक्टोबर 2023 रोजी कंपनीचा स्टॉक 3959 रुपयांच्या पातळीवर होता. या शेअरमध्ये 6 महिन्यांत 3,525.45 रुपयांची वाढ झाली आहे.

(टीप- शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.)

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारव्यवसायगुंतवणूक