मुंबई : ‘मेक इन इंडिया’द्वारे भारतात गुंतवणुकीच्या संधी निर्माण करण्याचे प्रयत्न होत असले तरी देशात उद्योगभिमुख वातावरणासाठी बरेच काम करावे लागेल, असे मत अनिवासी भारतीय उद्योजक धनंजय दातार यांनी व्यक्त केले.आखाती देशांमध्ये सुपर मार्केट्स साखळी चालविणारे दातार ‘मसालाकिंग’ म्हणून ओळखले जातात. त्यांच्या आत्मचरित्राचे ६ फेब्रुवारीला मुंबईत प्रकाशन होत आहे. त्यानिमित्ताने पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, आखाती देशांमध्ये उद्योगांना पहिली दोन वर्षे सवलती मिळतात. भारतात जीएसटी आहे, पण त्यात सवलती नाहीत. त्यामुळे विदेशातील गुंतवणूकदार अद्यापही भारतात जोमाने येण्यास तयार नाहीत.विकसित देशांत प्रत्येक श्रेणीतील कामगाराचे किमान वेतन निश्चित आहे. ते कंपनीमालकाने मध्यवर्ती बँकेद्वारे कामगाराच्या खात्यात जमा करणे आवश्यक असते. सरकारी विभाग या वेतनावर नजर ठेवून असतो. कमी वेतन जमा केल्यास मालकावर कारवाई होते. अशी व्यवस्था भारतात असणे गरजेचे आहे.भारतातही उतरणारआतापर्यंत आखाती देशांमध्ये सुपर मार्केट्सची साखळी उभी केल्यावर दातार भारतातील पहिले सुपर मार्केट येत्या सहा महिन्यांत उभे करणार आहेत. पण नेमके कुठे सुपर मार्केट उभे करणार, कुठे व किती गुंतवणूक असेल, याबद्दल त्यांनी कुठलेही भाष्य करण्यास नकार दिला. मातृभूमी भारतात येण्यास इतका का विलंबकेला, याचेही स्पष्ट उत्तर त्यांनी दिले नाही.पाच उद्योजकांना पुरस्कार‘धनंजय दातार बिझनेस टायकून आफ द इयर हा पुरस्कार या वर्षीपासून सुरू होत आहे. पुस्तक प्रकाशन आणि व पुरस्कार वाटप समारंभ ६ फेब्रुवारीला होणार आहे.
मेक इन इंडियासाठी हवे उद्योगाभिमुख वातावरण, मसालाकिंग धनंजय दातार यांचे मत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 01:14 IST