Join us

ज्यांनी ChatGPT तयार केले, त्यांचीच रातोरात कंपनीतून हकालपट्टी केली; कारण काय..?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2023 20:11 IST

OpenAI Fires CEO: OpenAI च्या बोर्डाने कंपनीचे CEO सॅम ऑल्टमन यांना पदावरून हटवले आहे.

OpenAI Fires CEO: या वर्षाच्या सुरुवातीपासूनच OpenAI चर्चेत आहे. कंपनीने आपला जनरेटिव्ह AI चॅटबॉट ChatGPT गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये लॉन्च केला होता. अवघ्या एका महिन्यात या AI चॅटबॉटच्या युजर्सची संख्या लाखांवर पोहोचली. काही महिन्यांतच याची सर्वत्र चर्चा होऊ लागली. आता कंपनी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे, याचे कारण म्हणजे, कंपनीच्या बोर्डाने दोन संस्थापक सदस्यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे.

सॅम ऑल्टमन यांना कंपनीतून काढून टाकलेOpenAI च्या बोर्डाने कंपनीचे CEO सॅम ऑल्टमन यांना त्यांच्या पदावरून हटवण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने आपल्या निवेदनात म्हटले की, सॅम ऑल्टमन त्यांच्या संभाषणांबद्दल स्पष्ट नाहीत, त्यामुळे बोर्डाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. बोर्डाला आता ऑल्टमनच्या क्षमतेवर विश्वास राहिलेला नाही, त्यामुळे त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे.

OpenAI अध्यक्षांचा राजीनामासॅम ऑल्टमन यांना कंपनीच्या बोर्डाने त्यांच्या पदावरून हटवले, त्यांच्या राजीनाम्यानंतर काही तासांतच ओपनएआयचे अध्यक्ष ग्रेग ब्रॉकमन यांनीही राजीनामा दिला. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर त्यांनी ही माहिती दिली आहे. बोर्डाने आज जे काही केले त्यामुळे सॅम आणि मी दोघेही हैराण आणि दु:खी आहोत असे त्याने लिहिले आहे.

यापूर्वीही असे घडले आहेएखाद्या कंपनीच्या संस्थापक सदस्यांना काढून टाकण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही हे घडताना आपण पाहिले आहे. व्हॉट्सअॅप किंवा ट्विटरबद्दल असेच झाले. फेसबुकने जेव्हा व्हॉट्सअॅप विकत घेतले, तेव्हा त्यांची सेवा खूपच खालावली होती. व्हॉट्सअॅपचे सह-संस्थापक ब्रेन अॅक्टन हे फेसबुकच्या अधिग्रहणानंतर कंपनीपासून वेगळे झाले. ट्विटरबद्दलही असेच झाले. जॅक डोर्सीपासून वेगळे झाल्यानंतर ट्विटरची कमान पराग अग्रवाल यांच्या हातात होती. मात्र, काही काळानंतर इलॉन मस्कने ट्विटर विकत घेत पराग अग्रवाल यांची कंपनीतून हकालपट्टी केली. 

टॅग्स :व्यवसायतंत्रज्ञानआंतरराष्ट्रीय