Join us  

पोस्टाची ही योजना आहे खास, 150 रुपयांच्या बचतीवर लाखो रुपये कमवा हमखास

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2018 4:47 PM

पोस्टाच्या अनेक योजना खूप खास आहेत. ब-याचदा गुंतवणुकीवर चांगली रिटर्न्स मिळतात.

नवी दिल्ली- पोस्टाच्या अनेक योजना खूप खास आहेत. ब-याचदा गुंतवणुकीवर चांगली रिटर्न्स मिळतात. विशेष म्हणजे पोस्टात तुम्ही छोटी छोटी रक्कमही गुंतवू शकता आणि त्यावर व्याजाच्या स्वरूपात मोठी रक्कम कमावू शकता. सरकारी योजना असलेल्या पीपीएफचेही अनेक फायदे आहे.तुम्ही या योजनेत 150 रुपये गुंतवल्यावर 20 वर्षांच्या नोकरीत तुम्हाला 25 लाख रुपये कमावता येतात. तसेच पोस्टात गुंतवलेले पैसे हे पूर्णतः सुरक्षित असतात. 25व्या वर्षी जर तुम्हाला 30 ते 35 हजार पगार असल्यास तुम्ही त्यातील 100 ते 150 रुपये दररोज वाचवून पीपीएफमध्ये गुंतवू शकता. तसेच वय वर्षं 45 झाल्यानंतर तुम्हाला या रकमेवर व्याजासकट 25 लाख रुपये मिळतात. दरदिवशी खर्च होणा-या पैशातून 100 ते 150 रुपये वाचवणं अवघड नाही.15 वर्षीय सार्वजनिक भविष्य निधी खातं(पीपीएफ)- पीपीएफचं खातं तुम्हाला 100 रुपयांमध्ये उघडता येते. यात आर्थिक वर्षामध्ये एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर लाभ मिळतो. यातील जमा रकमेवर 8 टक्के व्याज दिलं जातं. खातेधारकांना आपल्या खात्यात 500 रुपये आणि जास्त करून 1.50 लाख रुपये जमा करावे लागतात. तसेच खात्याची मर्यादा 15 वर्षांसाठी आहे. यात तुम्ही संयुक्त अकाऊंटही उघडू शकता. तुम्हाला या योजनेत नॉमिनेशनची सुविधाही मिळते. यात एका वित्त वर्षात तुम्हाला एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर चांगला फायदा मिळतो.डिसेंबरमध्ये समाप्त होणा-या तिमाहीसाठी पीपीएफमध्ये जमा असलेल्या रकमेवर प्रतिवर्षी 8 टक्के व्याज मिळते. दरवर्षी 6000 रुपयांची बचत केल्यास 15 वर्षांनी मुदत संपल्यावर 1.7 लाख रुपये तुम्हाला मिळू शकतात. खात्रीशीर व्याज देणारा आणि सुरक्षित पर्याय तसेच तरुण मुला-मुलींनी बचत सुरू करण्यास प्रारंभीच्या टप्प्यात पीपीएफचा पर्यायाचा विचार केला पाहिजे. जितक्या लवकर बचत सुरू करता येईल तितके चांगले फायदे आपल्याला मिळतात.

टॅग्स :पोस्ट ऑफिस