Join us
Daily Top 2Weekly Top 5

२०१९ मध्ये विकली केवळ एकच नॅनो कार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2020 04:57 IST

टाटा मोटर्सने २०१९ मध्ये आपली प्रवेश पातळीवरील कार नॅनोची एकही गाडी उत्पादित केली नाही, तसेच या संपूर्ण वर्षात फक्त फेब्रुवारीमध्ये एक नॅनो कार विकण्यात आली.

नवी दिल्ली : टाटा मोटर्सने २०१९ मध्ये आपली प्रवेश पातळीवरील कार नॅनोची एकही गाडी उत्पादित केली नाही, तसेच या संपूर्ण वर्षात फक्त फेब्रुवारीमध्ये एक नॅनो कार विकण्यात आली. रतन टाटा यांच्या स्वप्नातील ‘लोकांची कार’ असलेल्या नॅनोला टाटा मोटार्सने अजून अधिकृतरीत्या निवृत्त मात्र केलेले नाही. टाटा मोटार्सने दाखल केलेल्या नियामकीय दस्तावेजात ही माहिती देण्यात आली आहे. डिसेंबर २०१९ मध्ये नॅनोचे उत्पादन शून्य राहिले.डिसेंबर २०१८ मध्ये ८२ गाड्यांचे उत्पादन व ८८ गाड्यांची विक्री झाली होती. नोव्हेंबर २०१९ मध्येही नॅनोचे उत्पादन व विक्री शून्य राहिली. २०१८ च्या नोव्हेंबरमध्ये ६६ गाड्यांचे उत्पादन व ७७ गाड्यांची विक्री झाली होती. आॅक्टोबर २०१९ मध्ये नॅनोचे उत्पादन व विक्री शून्यावर राहिली. आॅक्टोबरमध्ये ७१ गाड्यांचे उत्पादन व ५४ गाड्यांची विक्री झाली

टॅग्स :टाटा