Join us

गिफ्ट हॅम्परच्या नावाखाली जुना माल? होणार दंड; १ फेब्रुवारीपासून नवे नियम होणार लागू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2023 08:16 IST

सणासुदीला किंवा लग्नकार्यात अनेक जण भेट म्हणून गिफ्ट हॅम्पर्स देतात.

नवी दिल्ली :

सणासुदीला किंवा लग्नकार्यात अनेक जण भेट म्हणून गिफ्ट हॅम्पर्स देतात. त्याद्वारे अनेकदा जुना माल खपविण्यात येताे. अशा प्रकारांना आता चाप बसणार आहे. मुदत संपलेली किंवा मुदत संपण्याची तारीख जवळ आहे, अशी उत्पादने भेट दिल्यास कारवाई हाेणार आहे. केंद्र सरकारने याबाबत नवी नियमावली केली असून, त्याची अंमलबजावणी १ फेब्रुवारीपासून हाेणार आहे.

गिफ्ट हॅम्परमधून मुदत संपलेल्या वस्तू खपविण्यात आल्याचे प्रकार गेल्या वर्षी माेठ्या प्रमाणात उघडकीस आले हाेते. गिफ्ट पॅकच्या आत असलेल्या वस्तूंची माहिती दिसत नाही. त्यामुळे त्यांची मुदत संपली आहे की लवकरच संपणार आहे, हे कळायला मार्ग नसताे. त्यामुळे कंपन्या फसवणूक करतात. हा प्रकार राेखण्यासाठी ग्राहक संरक्षण मंत्रालयाने नवे नियम जारी केले आहेत.

ही माहिती द्यावी लागणार- गिफ्ट हॅम्परमधील सर्व उत्पादनांची माहिती पॅकिंगच्या आवरणावर देणे बंधनकारक आहे. - एक्स्पायरी डेट, उत्पादक कंपनी, पॅकिंग काेणी केले, आयात काेणी केले, वजन, वस्तूंची संख्या तसेच वस्तू काेणत्या देशात उत्पादित झाली अशी हाेईल कारवाई- गिफ्ट हॅम्परच्या नावाखाली मुदतबाह्य वस्तू खपविल्यास १० लाख रुपयांचा दंड आणि २ वर्षांपर्यंत तुरुंगवास, अशा शिक्षेची तरतूद केली आहे.

टॅग्स :व्यवसाय